भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ७,६७,२९६; नवे २१,१२९

corona patients in India

मुंबई :- भारतात आज ९ जुलै रोजी कोरोना रुग्णांची संख्या ७,६७,२९६ झाली आहे. एकूण २१,८७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत नवे रुग्ण २१,१२९ आढळले असून गेल्या २४ तासांत ४८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात हा आकडा २,२३,७२४ रुग्ण, गेल्या २४ तासांत ६,६०३ नवे रुग्ण, एकूण मृत्यू ९,४४८ आणि गेल्या २४ तासांत १९८ मृत्यू आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सरकारने दिली आहे.

कोरोनाच्या रुग्णांच्या मृत्यूचा दर जगात ४.६३, भारतात २.७५ आणि महाराष्ट्रात ४.२२ टक्के आहे. दरम्यान, जगात रुग्णांची संख्या १,१६,६९,२५९ झाली आहे. एकूण ५,३९,९०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ४,१४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे व नवे १,६८,९५७ रुग्ण आढळले आहेत.

ही आकडेवारी अनालिटिक्स मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग्ज डिपार्टमेंटने तयार केली आहे. याचा डेटा पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रने संकलित केला आहे. आकडेवारी ९ जुलैच्या सकाळी १० वाजेपर्यंतची आहे.

Check PDF

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER