विराट कोहलीसाठी 11 चा आकडा आहे खास…यशातही आणि अपयशातही !

Virat Kohli

विराट कोहली (Virat Kohli) व अनुष्का शर्मा (Anushka Sharma) म्हणजे ‘विरुष्का’ यांच्या घरी लक्ष्मी आली. 11 जानेवारीला त्यांना कन्या प्राप्ती झाली. योगायोगाने तीन वर्षापूर्वी 11 डिसेंबरलाच विराट व अनुष्का विवाहबध्द झाले होते. गेल्या दोन दिवसात या योगायोगाची सोशल मीडियावर (Social Media) खूप चर्चा आहे.

2013 मध्ये एका जाहिरातीच्या माध्यमातून विराट व अनुष्का एकत्र आले आणि तेंव्हापासून ही जोडी सातत्याने चर्चेत आहे. त्यांना मीडियानेच ‘विरुष्का’ हे नाव दिले आहे. त्यानंतर 11 डिसेंबर 2017 रोजी ते विवाहबध्द झाले आणि गेल्या ऑगस्टमध्ये त्यांनी ते दोनाचे तीन होणार असल्याची बातमी जाहीर केल्यापासून ‘विरुष्का’ सातत्याने चर्चेत आहेत. विराट कोहली पितृत्व रजेवर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी परतला हा 2020 च्या शेवटी शेवटी सर्वात चर्चेचा मुद्दा होता.

विराटच्या आयुष्यात 11 या संख्येबाबत फारच योगायोग आहेत. सुरुवातच विराटच्या जन्मतारखेपासून…5 नोव्हेंबर 1988 ही त्याची जन्मतारीख! म्हणजे 11 व्या महिन्यातच त्याची जन्मतारीख आली.

नंतर विराट व अनुष्का हे विवाहबध्द झाले ती तारीखही 11च होती. 11 डिसेंबर 2017! इटलीतील फ्लोरेन्स येथे ते विवाहबध्द झाले होते. अगदी जवळचे मित्र व कुटुंबियांच्या उपस्थितीत तो विवाहसोहळा झाला होता.

त्यानंतर त्यांच्या घरी तीन वर्षानंतर लक्ष्मीचे आगमन झाले ती तारीखही 11 च होती. 11 जानेवारी 2021. ही आनंदाची बातमी शेअर करताना विराटने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते, ‘ तुमच्याशी शेआर करायला आनंद होतोय की आमच्या घरी कन्येचे आगमन झाले आहे. आपणा सर्वांनी दिलेले प्रेम, शुभेच्छा आणि केलेल्या प्रार्थनांसाठी आम्ही आभारी आहोत. अनुष्काआणि बेबी, दोन्ही व्यवास्थित आहेत आणि आमच्या आयुष्यातील हे नवे पान लिहिताना आम्ही अतिशय आनंदी आहोत.’

विराटबद्दल 11 चा आणखी एक योगायोग म्हणजे त्याने 2018 मध्ये वर्षभरात केलेली आंतरराष्ट्रीय शतकेसुध्दा 11 च होती. आणि आणखी एका 11 च्या उंबरठ्यावर विराट आहे. येणारी टी-20 विश्वचषक स्पर्धा ही त्याची 11 वी आयसीसी स्पर्धा असेल. आयसीसीच्याच अंडर 19 विश्वचषक स्पर्धेपासून विराट नावारुपाला आला होता.

आणखी दोन 11 विराटच्या कारकिर्दीत आहेत पण ते स्मरणात ठेवावे असे नाहीत. पहिला म्हणजे गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या अॕडिलेड कसोटीत भारतीय संघ अवघ्या 36 धावांत बाद झाला होता तेंव्हा सर्वच्या सर्व 11 खेळाडूंच्या धावा एकेरीच होत्या आणि योगायोगाने कर्णधार विराटच होता. अशाप्रकारे 11 शी त्याचा पुन्हा योग जुळला. तब्बल 96 वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये असे पहिल्यांदाच घडले होते. विराटच्या स्वतः त्या डावात फक्त चार धावा होत्या.

याशिवाय 2020 हे विराट कोहलीसाठी गेल्या 11 वर्षानंतर पहिलेच असे वर्ष ठरले की या वर्षात तो एकही आंतरराष्ट्रीय वन डे शतक करु शकला नाही. 2009 पासुन दरवर्षी किमान एकतरी वन डे शतक करण्याची त्याची मालिका खंडीत झाली. याप्रकारे विराट कोहलीच्या आयूष्यात 11 चे एक वेगळेच स्थान आहे.

ही बातमी पण वाचा : अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी होते क्लासमेट, जाणून घ्या- दोघांनी केव्हा घेतले सोबत शिक्षण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER