आता ऑनलाईन पाहायला मिळणार कुस्ती थरार

सांगली :  कुस्ती (Wrestling) म्हणलं की बलदंड पैलवान, त्यांच्या शड्डू आवाज आणि प्रेक्षकांच्या कल्लोळ असे काहीसे समीकरण आजपर्यंत पाहायला मिळाले आहे. कोरोना विषाणूच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंगचे (Social Distacing) कारण देत कुस्ती मैदाने बंद करण्यात आली. त्यामुळे पैलवानांच्या शड्डू आवाजच बंद झाला.

भारतातील पहिल्या विना प्रेक्षक ऑनलाईन कुस्ती (Online Wrestling) दंगलीचे आयोजन कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे करण्यात आले आहे. अनेक लहान मोठ्या कुस्त्या या मैदानात लावण्यात येणार आहेत. सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारतात कुस्ती मैदान भरवण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.

मात्र लाखो रुपये खर्च करून पैलवानांनी तब्येत राखली आहे. कुस्ती मैदान बंद असल्याने खुराखचा खर्च वाया जात आहे. या पार्श्वभूमीवर कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या मैदानास महत्त्व प्राप्त झाले असून आज, दुपारी तीन वाजल्यापासून या मैदानाचा ऑनलाईन लाभ घ्यावा असे आवाहन सांगली जिल्हा प्रमुख पै. प्रवीण शिंदे व कार्याध्यक्ष सिद्धेश्वर गायकवाड यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER