‘आता आपणच बीडच्या लोकांसाठी देवदूत’, पंकजा मुंडेंचे शरद पवारांना भावनिक आवाहन

Pankaja Munde & Sharad Pawar

औरंगाबाद : जनप्रतिनिधी म्हणून आपण ज्यांच्यावर बीड जिल्ह्याची सोपवली आहे, ते सपशेल अपयशी ठरले आहेत, त्यांना लोकांच्या जीवापेक्षा राजकारणातच अधिक आनंद मिळत आहे. मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णांना पाया पडून देखील रेमडीसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. माझी शरदचंद्र पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व मुख्यमंत्र्याकडेही हात जोडून विनंती आहे, की माझ्या बीड जिल्ह्यातील लोकांची होणारी हेळसांड थांबवा, आता आपणच बीड जिल्ह्याच्या लोकांसाठी देवदूत आहात, असे भावनिक आवाहन करत भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे (Pankaja Munde)यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मदतीची विनंती केली आहे. तसेच आपले बंधू व बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर निशाणा साधला आहे.

अंबाजोगाई शासकीय रुग्णालयाच्या एकाच रुग्णवाहिकेत तब्बल २२ कोरोना मृतांचे मृतदेह कोंबून नेल्याच्या प्रकारावर संताप व्यक्त करणारा एक व्हिडिओ पंकजा मुंडे यांनी फेसबुकवरून जारी केला आहे. अंबाजोगाईतील या प्रकाराबद्दल संताप आणि मृतांबद्दल दुःख व्यक्त करतांनाच त्यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील नाव न घेता जोरदार टीका केली.

पकंजा मुंडे म्हणाल्या, बीड जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना एका इंजेक्शनसाठी प्रशासनातील लोकांचे पाय धरावे लागत आहे. मेडिकलचालक, डाॅक्टरांकडून नोंदणी करून देखील रेमडीसिवीर इंजेक्शन उपलब्ध करुन दिले जात नाही, कारण त्यांना तसे आदेश देण्यात आलेले नाही. डाॅक्टरांना बोलण्याचा अधिकार नाही, जिल्हा प्रशासन दबावाखाली काम करत आहे. बीड जिल्ह्यातील लोकांची अशी हेळसांड याआधी कधीच झाली नव्हती.

परळीतील एका डाॅक्टला देखील रेमडीसिवीरचे इंजेक्शन मिळाले नाही. बीडच्या जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन अभावी दोन रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. एकीकडे हे सगळं सुरू असतांना जिल्ह्यातील सत्ताधारी मात्र राजकारण करण्यात आनंद मानत आहेत. अजित पवार यांनी रेमडीसिवीर इंजेक्शन कुणाच्या खिशातून जाता कामा नये असे म्हटले होते, पण इथे नोंदणी करून देखील ते रुग्णांना दिले जात नाही. कुणी बोलायला तयार नाही, चौकशी केली तर ती कशी दडपायची याचा अनुभव जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांना चांगलाच आहे.

तेव्हा माझी शरदचंद्र पवार साहेब, अजितदादा व मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे, की त्यांनी जातीने बीड जिल्ह्याकडे लक्ष घालावे. तुम्ही ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे, ते अपयशी ठरले असून कोरोनासारख्या महामारीत देखील ते राजकारणाला प्राधान्य देत आहेत, आपण राजकारणापेक्षा कधीही जनतेच्या हिताला प्राध्यान्य दिले. प्रसंगी कठोर भूमिका घेतली, त्यामुळे माझे राजकीय नुकसान देखील झाले, पण आपण भूमिकेशी तडजोड केली नाही? असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button