‘आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरे आहेत हे कर्नाटकच्या येड्यानी विसरु नये’- संजय राऊत

Sanjay Raut - Uddhav Thackeray

मुंबई :- बेळगाव (Belgaum) सीमाप्रश्न न्यायालयात प्रलंबित असतांना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव तर सोडा, मुंबईपण कर्नाटकाचा भाग आहे, मुंबईवर आमचाही हक्क आहे. तसेच मुंबई (Mumbai) प्रदेश केंद्रशासित करा, अशी मागणी केंद्र सरकारकडे (Central Government) करणार असल्याचं वक्तव्य त्यानी केलं आहे. त्यांच्या या विधानावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला.

असे वेडे बरळत असतात. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ‘ठाकरे’ (CM Uddhav Thackeray) आहेत हे विसरु नये असे म्हणत संजय राऊतांनी (Sanjay Raut) सवदी यांच्या विधानाचा समाचार घेतला. बेळगाव प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी काल भूमिका स्पष्ट केली आहे. ही लढाई आपली भाषा, संस्कृती टिकवण्यासाठी आहे. आम्ही देशाच्या बाहेर जायला म्हणत नाही. हा देशाचाच भाग आहे. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी एकदा महाराष्ट्रात यावं आणि त्यांच्या कानडी बांधवांशी चर्चा करावी, की ते सर्व आमचेच आहेत. मुंबईत कानडी संस्था मोठ्याप्रमाणात आहेत. मात्र त्यांची कधीही गळचेपी केली नाही. उद्या त्यांचंही मतदान घेतलं तर ते हेच सांगतील की बेळगाव महाराष्ट्रात आलं पाहिजे.

यावेळी त्यांनी दिल्लीत झालेल्या हिंसाचारावरुन मोदी सरकारवर गंभीर आरोप केले. सरकारला शेतकऱ्यांना चिरडून टाकायचं आहे. दडपशाही आणायची आहे, त्याचाच एक भाग म्हणजे आंदोलनात फूट पाडून, तिथला एक गट जो भाजपच्या नेतृत्त्वाखाली आतमध्ये घुसला आणि ते लाल किल्ल्यावर गेले, त्यांनी हडकंप माजवला. लाल किल्ल्यावर शेतकरी घुसले म्हणाले, ते खरंच शेतकरी होते का, आता फोटो आले आहे पंतप्रधानांसोबतचे त्यामुळे भाजपचा खरा चेहरा पुढे आला. ते लोक कोण आहेत, कुठे फरार झाले आहेत, आधी याचा तपास घ्यावा. आंदोलनात फूट पाडणे, नेत्यांवर गुन्हे दाखल करणे, शेतकऱ्यांना पाहून घेऊ अशी भाषा पोलीस करत आहेत, अधिवेशनात या सर्व प्रश्नांची सरकारला उत्तरं द्यावी लागतील, असा इशाराही त्यांनी मोदी सरकारला दिला.

ही बातमी पण वाचा : तुमची तोंडं का शिवली आहेत? आशिष शेलारांचा शरद पवार आणि संजय राऊतांना सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER