आता या वयात कसले व्हिजन बघायचे, ते काम नव्या पिढीकडे : शरद पवार

नवी मुंबई :- आता या वयात कसले व्हिजन बघत बसायचे. व्हिजन बघण्याचे काम नव्या पिढीकडे द्यायचे, आपण बघत राहायचे त्यांच्याकडे काही अडचण आली आणि विचारले तर सांगायचे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज येथे सांगितले. असे म्हणत त्यांनी राजकारण आणि समाजकारणातील एका नव्या भूमिकेचे संकेतच दिले आहे.

सोशल मीडियाला दोन्ही बाजू : रोहित पवार

वयाच्या या टप्प्यावर व्हिजन सांगणे योग्य नाही. तर आता तरुणांना व्हिजन द्यायचे व ते काय करतात हे पाहायचे, ते करत असलेल्या कामात हस्तक्षेप करायचा नाही, असंही ते म्हणाले आहेत. एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

लोकसभा व विधानसभा निवडणुकी दरम्यानही आपण निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली होती. सक्रीय त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या बदलत्या व नव्या भूमिकेचे संकेत दिले आहेत. तरुणांना व्हिजन देत त्यांचे काम मी पाहत असतो, त्यांनी विचारले तरच सल्ला देतो. कारण न विचारता सल्ला देणे व सतत कामांमध्ये हस्तक्षेप करणे योग्य नसते, त्यामुळे तुमचा मान राहत नाही. असेही पवार म्हणाले.