आता प्रतीक्षा मोठ्या अनलॉकची

Coronavirus - Maharashtra Unlock - Editorial
Coronavirus - Maharashtra Unlock - Editorial

Shailendra Paranjape‘माझी वसुंधरा’ अभियानात पुणे जिल्हा अव्वल स्थानी आला आहे. पर्यावरणविषयक उपक्रम २ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ कालावधीत राज्य सरकारने वसुंधरा अभियान राबवले होते. त्यात सामाजिक वनीकरण, वनसंवर्धन, सांडपाणी व्यवस्थापन, जमिनीची धूप कमी करणे, आदी विषयांवर पुणे जिल्ह्यात नगरपरिषदांमध्ये करण्यात आलेल्या कामांबद्दल पुणे जिल्ह्याला अव्वल स्थान मिळाले आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांनी यासंदर्भात घेतलेल्या पुढाकारामुळे जिल्हा अव्वल स्थानी आला आहे.

‘माझी वसुंधरा’ स्पर्धेत पुणे जिल्हा अव्वल स्थानी असला तरी आज जिल्ह्यात म्हणजे पुण्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या कमी झालेली नाही. त्यामुळे लॉकडाऊन शिथिल करण्यासंदर्भात पुणे शहरात निर्बंध शिथिल होतील पण ग्रामीण भागात मात्र सध्या तरी निर्बंध शिथिल करणे अवघड आहे.

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी कोरोनाच्या (Corona) संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करून तेराही तालुक्यांत बालरोग उपचारांसाठी स्वतंत्र रुग्णालय किंवा व्यवस्था उभारण्याचे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी दोन आठवड्यांपूर्वीच सांगितले आहे. पण मुळात ग्रामीण भागातला दुसऱ्या टप्प्यातला कोरोना आटोक्यात येण्याचीही गरज आहे. पुणे शहरातला कोरोना पूर्ण आटोक्यात आला आहे. त्यामुळे ‘माझी वसुंधरा’चे काम जितक्या तडफेने झालेले दिसते, त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणाचं कामही तितक्याच तर्कशुद्ध पद्धतीने होण्याची गरज आहे.

शिथिलीकरणाची घोषणा दोन दिवसांनी ७ जूनला केली जाईल, असे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्या नियमित कोरोना आढावा बैठकीनंतर स्पष्ट केले आहे. पुण्यात निर्बंध कदाचित आणखी कमी केले जातील आणि सलून, पार्लर्स सुरू करण्याचीही परिस्थिती बघून विचार करू, असं पवार यांनी सांगितलं आहे. त्यामुळे पुणेकरांना आणखी दिलासा मिळू शकेल.

आधी दुकानांच्या वेळा वाढवा, मग त्या आणखी वाढवा, अशा पद्धतीनेच निर्बंध शिथिल केले जातील, अशी आशा आहे. फक्त लोकांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घडवण्याची गरज आहे. पुण्यात निर्बंध कमी केले जातील; पण पुण्याच्या ग्रामीण भागात मात्र ते तसेच राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातून म्हणजे शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागातले होम क्वारन्टाइन लोक पुणे शहरात येणार नाहीत, हे बघायला हवे. शहराची हद्द सील करण्याची गरज आहे. लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी बॅरिकेडिंग करणे, चेकनाके स्थापन करून जिल्ह्याच्या भागातून लोक पुण्याकडे केवळ निर्बंध शिथिल आहेत, म्हणून येणार नाहीत, यावरही कडक नजर ठेवावी लागेल.

शिथिलीकरणात आता नाट्यगृहे, चित्रपटगृहेही सुरू करण्याचे उपाय करण्याची गरज आहे. कारण घरात बसून अमेझॉन, सोनी, हॉटस्टार अशा माध्यमातून चित्रपट बघूनही लोक बोअर झालेले आहेत. त्यामुळे नाटक – चित्रपट थिएटरात जाऊन बघण्याची सामाजिक गरज आहे आणि त्याचाही करमणूक म्हणून नव्हे, कोरोनाकाळात केवळ विरंगुळा नाही तर स्ट्रेस बस्टर म्हणूनही थिएटर्स सुरू करायला हवीत. त्याशिवाय आता पार्सल सेवेबरोबर रस्त्यावर उभे राहून भेळ, पाणीपुरी, कच्छी दाबेली, सँडविच हे सर्व खाता आलं पाहिले; कारण माणसं म्हणजे रोबो नाहीत. मशीनसारखं दोन महिने घरात बसून झालंय. त्यामुळे जीवनाचे हे सारे व्यवहारही सुरू होण्याची गरज आहे. हॉटेलमध्ये बसून खाता येणं, हा आनंद मिळाला तर कोरोना आपसूकच जाईल, असं वाटतं; कारण हॉटेल सुरू केल्यावर लोक बाहेर पडतील आणि कोरोनासुसंगत वर्तनासह हॉटेलिंग एंजॉय करतील. कारण तसे झाल्याने मानसिकदृष्ट्या माणसं पुन्हा उभारी घेऊ शकतील. त्यामुळे अनलॉक पर्व सुरू करायला हवे तरच लोक खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेऊ शकतील.

शैलेंद्र परांजपे

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button