आता होणार सगळीकडे भाजपाचाच महापौर – आशिष शेलार

Ashish Shelar BJP

ठाणे :- आतापर्यंत युतीमध्ये लढल्यामुळे पालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचा महापौर झाला. यापुढे शिवसेना आणि भाजपा (BJP) स्वबळावर लढणार आहेत. यावेळी राज्यातील सर्व महापालिकांवर भाजपाचाच महापौर निवडून येणार, असा विश्वास भाजपाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी व्यक्त केला.

ते ठाण्यात कोपरी प्रभागात देवीचे दर्शन घेण्यासाठी आले असताना एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. शेलार म्हणालेत, “महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) पहिल्यापासूनच बिघाड आहे. ही बिघडलेली आघाडी आहे. यांनी राज्याला बिघडवू नये एवढीच आमची इच्छा आहे. आम्ही आतापर्यंत युतीमध्ये निवडणुका लढवल्या.

त्यामुळे प्रत्येक महापालिकेत शिवसेनेचा (Shivsena) महापौर असायचा. यानंतर आम्ही स्वतंत्रपणे लढणार आहोत. त्यामुळे प्रत्येक महापालिकेवर भाजपाचाच महापौर होणार आहे.” भाजपाचे नेते वसंत गीते आणि सुनील बागुल यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. यावर बोलताना ते म्हणालेत, फोडाफोडीचे राजकारण कितीही केले तरी दुर्बलाला कधीच बळ मिळू शकत नाही. आम्ही स्वबळावर लढणारे आहोत. ते तिघेही दुर्बल आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER