आता उपचार रुग्णालयातच, होम आयसोलेशन बंद

Coronavirus - Isolation

औरंगाबाद : यापूर्वी कोरोना (Corona) रुग्णांसाठी होम आयसोलेशनला (Home Isolation) परवानगी होती. यात घरात राहून उपचार घेता येत होते. यासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेतले जात होते. आता ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी रुग्णांना खासगी रुग्णालय किंवा पालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे लागेल. घरी राहून उपचार घेता येणार नाही, असे पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी शनिवारी सांगितले.

वातावरणातील बदल, तसेच लग्न समारंभातील गर्दी, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमासाठी बाहेरगावी जाणे, मास्कचा न वापरणे, हे प्रकार आता नागरिकांनी थांबवावेत, असे आवाहन पाडळकर यांनी केले आहे. सुरुवातीच्या काळात होम आयसोलेशनला परवानगी होती. त्यावेळी बर्‍याच लोकांनी होम आयसोलेशनला पसंत केले.

कडक उपाययोजना, कोविड सेंटर सुरू
कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी मनपाने शहरात कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. तसेच रूग्णांच्या उपचारासाठी शनिवारपासून किलेअर्क व एमजीएम स्पोर्टस् येथील कोविड सेंटर पुन्हा सुरू केले आहे. नियम न पाळणार्‍या लग्न कार्यालये, कोचिंग क्लासेसवर पालिकेच्या नागरी मित्र पथकांकडून कारवाई केली जात आहे. सोबतच ज्या घरांत दोन ते तीन रूग्ण आढळत आहेत, अशा ठिकाणी सर्वेक्षण करण्याचे कामही पालिकेने हाती घेतले आहे. शहरात प्रवेश करणार्‍या मार्गावर चौकशीसाठी पथके, विमानतळ, रेल्वेस्टेशन व मध्यवर्ती बसस्थानकावर येणार्‍या प्रवाशांची नियमित कोरोना चाचणी केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER