
मुंबई : राज्य सरकारने दहावी व बारावीच्या परीक्षा अर्जांमधून हिंदू शब्द वगळला. त्यामुळे आता ठाकरे सरकारला (Thackeray Government) हिंदू शब्दाचेही वावडे वाटू लागले आहे, अशी टीका भाजप (BJP) नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षा फॉर्ममध्ये धर्माच्या रकान्यातून हिंदू शब्द वगळून अल्पसंख्याकेत्तर (नॉन-मायनॉरिटी) असा उल्लेख केला आहे. याप्रकरणी अतुल भातखळकर यांनी ट्विट करत तीव्र निषेध व्यक्त केला.२४ तासांत हा फॉर्म मागे घेऊन त्यात हिंदू धर्माचा उल्लेख न केल्यास भारतीय जनता पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही भातखळकर यांच्याकडून देण्यात आला.
बाटग्यांची बांग…
ठाकरे सरकारने हिंदुत्व सोडले, आता हिंदू शब्दावरही चौकट मारली. यांचा निलाजरे पणा पाहा 10 वी, 12 वी परीक्षेच्या फॉर्मवर हिंदू शब्द न वापरता नॉन मायनोरिटी हा शब्द वापरला आहे.याद राखा, फॉर्मवर येत्या 24 तासात हिंदू शब्द दिसला नाही तर, ठीक ठिकाणी फॉर्मची होळी करू. pic.twitter.com/KRZDRDrnjm
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 2, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला