आता ‘स्पुतनिक’ लसीचा पर्याय Cowin अ‍ॅपवर

Sputnik - COWIN - Maharashtra Today

मुंबई :- कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण हे सर्वांत मोठे हत्यार आहे. या पार्श्वभूमीवर जगभरात लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. आता १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला होता. कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड लसीनंतर सरकारने ‘स्पुतनिक व्ही’ या तिसऱ्या लसीला परवानगी दिली आहे. या लसीच्या दोन खेपा भारतात आधीच पोहचल्या आहेत. आता या लसीचा पर्याय कोविन पोर्टलवरही दिसू लागला आहे. यामुळे नागरिकांसाठी लसीचे तीन पर्याय उपलब्ध झाले आहेत.

कोविन अ‍ॅपवरून स्लॉट बुक करताना पिन कोड टाकून ऑप्शन सर्च करण्याचा पर्याय आहे. ‘स्पुतनिक व्ही’ लसीवर क्लिक केल्यास आपल्याला त्याच्याशी निगडित रुग्णालयांची यादी समोर येईल. स्पुतनिक लसीचा एक डोस ९४८ + ५ टक्के जीएसटी लागून एकूण किंमत ९९५ रुपये ४० पैसे इतकी असणार आहे.

रशियामधून पहिला साठा हा १ मे रोजी भारतात आणला गेला. स्थानिक औषध प्रशासनाने लसीला १३ मे रोजी मान्यता दिली. पुढील काही महिन्यांमध्ये टप्प्याटप्याने या लसीचा साठा पाठवला जाईल. दरम्यान दुसरीकडे भारतीय कंपन्यांच्या माध्यमातूनही या लसींची निर्मिती केली जाणार आहे. अनेक संशोधनांमध्ये ही लस ९० टक्के परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button