आता अनिल परबांवर अधिकाऱ्याचा लेटरबॉम्ब

Anil Parab

मुंबई :- परिवहन विभागात नाशिकला (Nashik) एक अधिकारी आहेत, गजेंद्र पाटील. हा विभाग किती प्रामाणिक आहे ते अख्खा विभाग जाणतो. आता या पाटलांनी थेट परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर लेटरबॉम्ब टाकला आहे. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तेव्हाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींचा लेटरबॉम्ब टाकला होता. आता गजेंद्र पाटील या नाशिकच्या आरटीओ अधिकाऱ्याने परब, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, उपसचिव प्रकाश साबळे, आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्यावर २५० ते ३०० कोटी रुपयांच्या कलेक्शनचे आरोप केले आहेत. खरमाटे यांनी कधी किती पैसा घेऊन कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या याचा चार्टच पाटील यांनी दिला आहे. मंत्रालयात आलेल्या एका २५ पानी निनावी तक्रारीचा आधार घेत पाटील यांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पंचवटी ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी ही तक्रार आल्यानंतर नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्याकडे सगळी कागदपत्रे पाठविली. असे म्हणतात की, या तक्रारीवर गुन्हा दाखल करू नये, चौकशीच करू नये म्हणून अदृश्य व्यक्तीकडून दबावही आणला गेला होता; पण दीपक पांडेय बधले नाहीत. त्यांनी नाशिकचे उपायुक्त (गुन्हे शाखा) यांना पाच दिवसांत सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. गजेंद्र पाटील हे तक्रारकर्ते असून ते चौकशीला सहकार्य करत नाहीत, असे कारण पंचवटी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी दिले होते. मात्र, दीपक पांडेय यांनी स्पष्ट केले की, ते सहकार्य करोत वा न करोत या तक्रारीची सखोल चौकशी करा.

ही बातमी पण वाचा : आघाडी सरकारची प्रतिमा मलीन करण्यासाठीच माझ्याविरोधात तक्रार, अनिल परबांचे स्पष्टीकरण

बजरंग खरमाटे हे परिवहन विभागातील अत्यंत वादग्रस्त असे अधिकारी आहेत. विभागातील बदल्यांचे आणि पदोन्नतीचे रॅकेट तेच चालवितात ही बाब या आधी अनेकदा चर्चिल्या गेली आणि माध्यमांनीदेखील त्याला प्रसिद्धी दिली. खरमाटे यांचे पोस्टिंग वर्धेला आहे; पण ते नागपूर ऑफिसमध्ये बसतात आणि राज्यभरातील कारनामे करण्यासाठी त्यांचा मुक्काम पुण्यातील एका अलिशान हॉटेलमध्ये असतो.

गेल्या काळात खरमाटे यांनी मंत्र्यांपर्यंत संधान साधून केलेल्या बदल्यांचे रेडकार्ड त्या निनावी तक्रारीमध्ये होते. मर्जीतील नाही म्हणून अधिकाऱ्यांना कसे छळले जाते व गैरसोयीच्या ठिकाणी त्यांच्या कशा बदल्या केल्या जातात याची उदाहरणेदेखील त्यात दिलेली आहेत. अर्थपूर्ण व्यवहार झाल्यानंतर कशा पटापट बदल्या होतात याचे मासलेवाईक किस्सेही आहेत. संदीप निमसे, राहुल कदम, प्रशांत ठाकरे, प्रताप राऊत, अमर आवारे, संदीप मेहेत्रे, अमोल पवार,  या अधिकाऱ्यांकडून ‘अर्थ’कृपा झाल्यानंतर त्यांच्या सोईच्या ठिकाणी बदल्या झाल्या.

सुनील क्षीरसागर, मयूर भोसेकर, जकिउद्दिन बिरादार, अरविंद फुलारी, रवींद्र सोलंकी, राहुल नलावडे, अनिल बागवान, विजय सावंत, संभाजीराव होलमुखे, सुनील राजमाने या अधिकाऱ्यांची अन्यायकारक बदली मॅटने रद्द केली होती. तथापि, नऊ महिने त्यांच्या फाईलवर कुठलाही निर्णयच घेतला गेला नाही. खरमाटे यांना लक्ष्मीदर्शन करण्यात आल्यानंतरच मॅटच्या आदेशानुसार बदल्या करण्यात आल्या असे तक्रारीत म्हटले आहे. पिंपरी-चिंचवडचे डेप्युटी आरटीओ अतुल आदे हे खरमाटे यांचे खास आहेत. नागपुरात त्यांना तीन वर्षे पूर्ण होण्याआधीच खरमाटे कृपेने त्यांना पिंपरी-चिंचवडला पाठविण्यात आले.

शासकीय नियमानुसार कुठल्याही पदोन्नतीनंतर नागपूर, अमरावती, औरंगाबाद या विभागात पदस्थापना देण्यात आल्यानंतर तीन वर्षांच्या आत तिथून पुन्हा सबळ कारणाशिवाय बदली देता येत नाही. हा नियम धाब्यावर बसवून मनीषा चौधरी, राहुल गायकवाड, शीतलकुमार कुंभार, दिग्विजय जाधव, भूषण कचरे, ज्योती जाधव, योगेश पाटील, भूषण राऊत या अधिकाऱ्यांचे विभागीय संवर्ग बदलून त्यांच्या नियमबाह्य बदल्या करण्यात आल्या. त्यासाठी किती अर्थपूर्ण व्यवहार झाला याची चौकशी करण्याची मागणी त्या पत्रात करण्यात आली होती.

तीन वर्षे पूर्ण होण्याआधीच विभागीय संवर्ग बदलून सागर पाटील, अभिजित गायकवाड, क्षितिज व्यवहारे, अमित मुंडे या अधिकाऱ्यांची बदली केली गेली. ज्ञानेश्वर हिरडे, अनिल अहेर, राजेंद्र नवले, तानाजी चव्हाण, हेमंत पाटील, राजेंद्र सावंत, अशोक यादव, रमेश माळवदे यांना निवृत्तीच्या एक दिवस आधी पदोन्नती देताना कोणते आर्थिक व्यवहार झाले असा सवालही करण्यात आला आहे.

Check PDF 1.-Letter TO Ani Parab

Check PDF 2.- Letter To Anil Parab

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button