आता राज्याची कायदा आणि सुव्यवस्था ईश्वराच्याच हातात ! चंद्रकांत पाटलांची टीका

Chandrakant Patil

मुंबई : येत्या दिवसांमध्ये राज्याची कायदा आणि सुव्यवस्था ईश्वराच्याच हातात आहे’, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले . काही वेळापूर्वीच एक धक्कादायक आणि दुःखद बातमी वाचली. राज्याचे सर्वोच्च पोलीस अधिकारी आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल हे आपल्या पदावरून पायउतार होऊन केंद्रीय सेवेत जाणार आहेत.

आमच्या राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी हा फारच घातक दिवस आहे की, त्यांच्यासारखा सक्षम अधिकारी राज्य सोडून जात आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये राज्याची कायदा आणि सुव्यवस्था ईश्वराच्याच हातात आहे’, असे म्हणत चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी निशाणा साधला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणतात, ‘राज्यातील गेल्या काही महिन्यांमधील घटनांमुळे जैस्वाल यांच्यासारख्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या भावनांना धक्का पोहोचला आहे. या महाभकास आघाडीच्या सरकारने सर्व धोरणांना बाजूला सारून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. भारताची गुप्तचर संघटना ‘रॉ’मध्ये काम केल्यानंतर सर्वप्रथम २०१८ साली जयस्वाल यांनी मुंबई पोलीस आयुक्ताचा पदभार सांभाळला. सरकार इतकी बहिरी आणि कुचकामी आहे की, पोलीस दलाला मजबूत करण्यासाठी जयस्वाल यांच्या सर्व सूचना आणि उपाययोजना धुडकावून लावत होती’, असा आरोपही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला.

‘सुबोध कुमार जयस्वाल यांच्या शिफारसीच्या विरुद्ध पूर्वीच्या ज्या पोलिसांना निलंबित केले गेले होते त्यांनाही पुन्हा पदावर नेमले गेले. आमच्या राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी हा फारच घातक दिवस आहे की, त्यांच्यासारखा सक्षम अधिकारी राज्य सोडून जात आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये राज्याची कायदा आणि सुव्यवस्था ईश्वराच्याच हातात आहे’, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER