‘अब की बार बाप-बेटे की सरकार!’ भाजपाचा उद्धव यांना टोमणा

Aaditya - Uddhav Thackeray - Sudhir Mungantiwar

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप करत, आज भाजपाने राज्यभर आंदोलन केलं. मुंबईतील आझाद मैदानात झालेल्या सभेत भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ‘अब की बार बाप-बेटे की सरकार!’ म्हणून उद्धव ठाकरेंना टोमणा मारला.

इंदोरीकर महाराजांच्या ‘त्या’ कीर्तनाचा व्हीडीओ युट्यूवर उपलब्ध नाही !

मुंबईत राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात भाजपाने शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिला अत्याचारांच्या घटनांवरून सरकारला धारेवर धरले. मुंबईत आझाद मैदानात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सभा झाली. या सभेत सुधीर मुनगंटीवार यांनी भाषण करताना, उद्धव ठाकरे सरकारवर अब की बार बाप-बेटे की सरकार, अब की बार स्थगिती सरकार, अशी टीका केली.

महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले. महिलांवर अत्याचार करणारे नराधम मोकाट कसे? असा सवाल केला. मागील सरकारच्या योजनांची चौकशी करण्याच्या मुद्द्यावरून मुनगंटीवार यांनी सरकारला आव्हान दिलं. म्हणाले – कितीशी चौकशी केली तरी, काही सापडणार नाही. त्या सरकारमध्ये शिवसेनाही सत्तेत होती, हेच ते विसरले आहेत!