आता सरकारची चांगलीच तंतरली, भातखळकर यांचा नवाब मालिकांना टोला

Atul Bhatkhalkar - Nawab Malik - Maharashtra Today

मुंबई : वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या फोन टॅपिंग संदर्भातील अहवलावरून सध्या चांगलेच राजकारण तापले आहे. या मुद्द्यावरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्योरोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. आता या पार्श्वभूमीवर भाजपा (BJP) नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकार (Thackeray Government) व राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) निशाणा साधला आहे.

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अहवालामुळे ठाकरे सरकारची चांगलीच तंतरली आहे. खंडणीखोरीचे बिंग फुटले आहे. अहवालात काहीच नाही, असे सरकारचे म्हणणे असेल तर त्यांनी अहवाल जनतेसमोर उघड करावा. अहवाल गुलदस्त्यात ठेवून दूध का दूध और पाणी का पाणी….कसे होईल? अशी बोचरी टीका भातखळकर यांनी केली आहे.

तसेच, रश्मी शुक्ला यांनी तयार केलेला टॉप सिक्रेट रिपोर्ट मी फोडला नाही, तो देवेंद्र फडणवीस यांनीच फोडला. असं आता घाबरून मंत्री नवाब मलिक म्हणत आहेत. नवाब मलिक (Nawab Malik) जर रिपोर्ट फोडला असेल तर फोडला म्हणा घाबरता कशाला? आम्हीतर तेव्हाच सांगितलं आहे की, आमच्यावर कारवाई करा फोडला म्हणून, गुन्हा दाखल करा. तुम्ही आता कशाला एवढं घाबरत आहात? अगोदर रिपोर्ट जाहीर तर करा. रिपोर्टमध्ये काही दम नाही तर रिपोर्ट जाहीर करुन रिपोर्टप्रमाणे कारवाई करा. पण स्वतःच्या खंडण्या व स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी अशाप्रकारची वक्तव्य नवाब मलिक व राष्ट्रवादी करते आहे. तुमच्या पायाखालची आता वाळू सरकली आहे, हेच तुमच्या या घाबरट वक्तव्यांवरून सिद्ध होत आहे. असंही भातखळकर म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER