आता राष्ट्रवादीची जम्मू-काश्मीरमध्येही एंट्री, माजी खासदारासह अनेक पदाधिकाऱ्यांचा प्रवेश

NCP - Maharastra Today

नवी दिल्ली : केंद्रातील एनडीए सरकारचा विरोध करण्यासाठी एनडीए कमी पडत आहे. युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची प्रकृती ठीक राहत नसल्याने युपीएच अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे सोपवण्याची मागणी होऊ लागली आहे. तर दुसरीकडे पवार यांनीही राष्ट्रीय मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ते १ एप्रिलपासून पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरणार आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamta Banrjee) यांच्यासाठी ते प्रचारसभा घेणार आहे. एकंदरीत त्यांनी आता राष्ट्रीय राजकारणात लक्ष घालण्यास सुरूवात केली आहे.

दरम्यान, पवारांनी युपीएच अध्यक्षपद मिळवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख राष्ट्रीय स्तरावर निर्माण करण्यासाठी त्यांनी इतर राज्यांवर लक्ष घालण्यास सुरूवात केली आहे. नुकताच त्यांनी झारखंडचा दौरा करुन स्थानिक नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पक्ष वाढीचा सल्ला दिला होता. त्यानंतर आता त्यांनी जम्मू-काश्मीरमध्येही राष्ट्रवादीचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहे.

नुकताच जम्मू काश्मीरमधील मोठा पक्ष असलेल्या जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी खासदार अब्दुल रशीद शाहीन यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी त्यांचा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यावेळी शाहीन यांच्यासोबत माजी महापौर जी. आर. डार, तारिक शेख, सुमैरा रसूल, रौफ शफी, आदित्य सप्रू यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. के. शर्मा उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER