आता आदित्य ठाकरेंच्या वरळी पॅटर्नची नाही, तर आव्हाडांच्या पॅटर्नचीच चर्चा

Jitendra Awhad - Aaditya Thackeray - CM Uddhav Thackeray

ठाणे : एकेकाळी कोरोनाचा (Corona) हॉटस्पॉट ठरलेल्या मुंब्रा शहरात शुक्रवारी एकही नवा कोरोना रुग्ण आढळून आला नाही. यामागे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची उपाययोजना यशस्वी झाल्याची चर्चा सध्या ठाण्यात सुरू झाली आहे. वरळी नाही तर आव्हाड पॅटर्न अधिक प्रभावशाली ठरत असल्याचे सांगण्यात येत आहे. तर मुंब्रा शहरात १० दिवसांत फक्त ५३ बाधित सापडले असून, साथरोग आटोक्यात आणण्यासाठी आव्हाड यांनी काही उपाययोजना मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, त्याला महापालिकेनेही सकारात्मक प्रतिसाद दिला.

त्याचा हा परिमाण असल्याचं म्हटलं आहे. ठाण्यात कोरोनाबाधितांची सुरुवात ज्या मुंब्रा परिसरात झाली आता त्याच मुंब्र्यात रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. झोपडपट्टी तसेच धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी रस्त्यावरती मुक्तपणे फिरणार्‍या नागरिकांमुळे येथील बाधितांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती; मात्र मागील १० दिवसांत येथे केवळ ५३ नवे कोरोनाबाधित आढळून आले.

आज शुक्रवारी येथे एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे मुंब्र्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. या कोरोनामुक्तीमुळे ठाणे शहरातील हॉटस्पॉट आणि कंटेन्मेंट झोन परिसरातीलदेखील रुग्णसंख्या कमी झाली पाहिजे, असे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER