आता गडचिरोलीतही दारूबंदी उठवण्यासाठी ‘ठाकरे’ सरकारच्या हालचाली

liquor-ban

गडचिरोली :- दोन दिवसांपूर्वी ठाकरे सरकारने (Thackeray Govt) मोठा निर्णय घेत चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवली. त्यानंतर आता ठाकरे सरकार आणखी एका जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याच्या विचारात आहे. चंद्रपूरची दारूबंदी उठवल्यानंतर आता गडचिरोलीचीही (Gadchiroli) दारूबंदी (liquor-ban) उठवण्याचे संकेत मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्याकडून देण्यात आले आहे.

त्यामुळे आता गडचिरोली जिल्ह्यातील लोकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पण तिथं पालकमंत्री वेगळे आहेत. त्यामुळे त्यांच्याशी बोलून पुढील कार्यवाही केली जाईल, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. तर गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यातील लोकांच्या भावना जाणून घेऊन निर्णय घ्यावा, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. तर वडेट्टीवार यांनी दारूबंदीला विरोध करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर टीकेची तोफ डागली. दारूबंदीला विरोध करणारे जिल्ह्यातील समाजसेवक बेगडी आहेत. या जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये त्यांचे कुठलेही योगदान नाही, जनता त्यांच्या पाठीशी नाही.

तेच लोक आपली भूमिका मांडत असतात, अशी टीका त्यांनी केली. चंद्रपूरप्रमाणेच गडचिरोलीतही दारूबंदीचा आढावा घेणारी एखादी समिती पालकमंत्र्यांनी स्थापन केली तर त्यात कौल समोर येऊ शकतो. त्या दृष्टीने त्यांच्याशी चर्चा करू, असे सांगत वडेट्टीवार यांनी गडचिरोलीच्या दारूबंदीला उठवण्याची एक प्रकारे तयारीच केल्याचे दिसून येते.

ही बातमी पण वाचा : ‘गोमांस आणि दारु’ची चिंता करणारे ‘पवार-ठाकरे’ महाराष्ट्रासाठी ग्रहणच – आचार्य तुषार भोसले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button