आता मराठीतही इंजिनिअरिंगचा अभ्यास; उदय सामंतांची घोषणा

Uday Samant

मुंबई : मराठी भाषेच्या प्रसार आणि प्रचार केवळ ‘मराठी भाषा गौरव दिना’पुरते मर्यादित ठेवू नये, तर ३६५ दिवस चालू ठेवणे आवश्यक आहे, असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितले. ग्रंथालय संचालनालयाने आयोजित प्रबोधन पाक्षिक शताब्दी आणि मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले. मराठी भाषा ही सर्वश्रेष्ठ भाषा आहे. आपल्याला मातृभाषेचा अभिमान असला पाहिजे. जगभरात मराठी भाषा दिन साजरा केला जातो. प्रत्येक क्षेत्रामध्ये मराठी भाषेचा वापर होणे आवश्यक आहे, असेदेखील उदय सामंत यांनी दिली.

विद्यार्थ्यांचा फायदा

पुढील वर्षापासून अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम इंग्रजी भाषेबरोबर मराठी भाषेतही उपलब्ध होणार, असा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मातृभाषेत तंत्र शिक्षण घेण्यास मदत आणि त्या विषयाची समज अधिक स्पष्ट होईल, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

मराठी विद्यार्थ्यांसाठी दिल्लीत राहण्याची व्यवस्था

“दिल्लीतील नवीन मराठी माध्यमाच्या शाळेच्या विकास व नूतनीकरणासाठी प्रयत्न केले जातील. दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करणार्‍या मराठी विद्यार्थ्यांसाठी निवासाची व्यवस्था करण्याचा प्रयत्नही सुरू आहे. सीमा भागातील मराठी विद्यार्थ्यांसाठी कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार. प्रबोधन पाक्षिकाचे शताब्दी वर्ष आपण साजरे करतो ही आनंदाची बाब आहे. राज्यामध्ये सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरुवात प्रबोधनकार ठाकरे यांनी केली. राज्याच्या जडणघडणीत त्यांचे स्थान हे अद्वितीय आहे. स्वप्न पूर्ण करणे हेच त्यांचे स्मरण असेल.” असेही उदय सामंत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER