दक्षिण आफ्रिकेचे ‘जशास तसे’ उत्तर,ऑस्ट्रेलियात खेळण्यास स्पष्ट नकार

Now South Africa rejects Australia proposal

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) कोरोनाच्या भीतीपायी दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) दौरा रद्द केल्याचे लगेच पडसाद उमटले आहे. क्रिकेट साउथ आफ्रिकाने (CSA). ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयावर नाराजी तर व्यक्त केलीच आहे, शिवाय ऑस्ट्रेलियात येऊन पुढील महिन्यात ही मालिका खेळण्याचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा प्रस्तावही नाकारला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेत खेळण्यास नकार दिल्यावर वातावरण तापल्याचे पाहून दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या देशात येऊन खेळावे असा प्रस्ताव मांडला होता. यावर अपेक्षेप्रमाणे क्रिकेट साऊथ आफ्रिकाने नकार कळविला आहे आणि त्यांची ही प्रतिक्रिया आम्ही समजू शकतो असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. नीक हाॕकली (Nick Hockley) नावाच्या या अधिकाऱ्याने दक्षिण आफ्रिकेने जैवसुरक्षेचे उपाय केले असले तरी या दौऱ्यात कसे धोके होते हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. दक्षिण आफ्रिकन संघाने ऑस्ट्रेलियात येऊन पर्थ येथे सामने खेळावेत असा प्रस्ताव दिला आहे. पर्थ येथे दक्षिण आफ्रिकेचा संघ चांगल्याप्रकारे यशस्वी झाला आहे.

अपेक्षेप्रमाणे क्रिकेट साऊथ आफ्रिकाने याला नकार देताना ऑस्ट्रेलियात जाऊन खेळण्यासाठी लागणारा वेळ आणि लागणारा खर्च पाहता दक्षिण आफ्रिका क्रिकेटचे इतर ठरलेले कार्यक्रम यामुळे प्रभावित होतील असे कारण दिले आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE) सारख्या तटस्थ स्थळी खेळण्याची चर्चासुध्दा याच कारणामुळे निष्फळ ठरली.

हॉकली यांनी म्हटले आहे की, क्रिकेट साऊथ आफ्रिकासोबत आमची चर्चा सुरु आहे. येत्या आठवड्यांमध्ये काही तोडगा निघाला तर येत्या काही महिन्यात या मालिकेचा कार्यक्रम पुन्हा आखता येईल. आम्ही ऑस्ट्रेलियात येऊन खेळायचा प्रस्ताव दिला होता पण आपले ठरलेले इतर कार्यक्रम आणि क्वारंटीन नियम यामुळे ते शक्य नसल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कळविले आहे. तटस्थ स्थळांबद्दल तेवढी सखोल चर्चा झाली नाही कारण वेगवेगळ्या ठिकाणच्या नियमावलीचा प्रश्न येतो. क्रिकेट साऊथ आफ्रिकाने नकार कळवला असला तरी आमचे प्रयत्न सुरु आहेत.

या तणातणीत आता ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेदरम्यानची मालिका होणे अवघडच दिसत आहे मात्र त्यासाठी कसोटी क्रिकेटच्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या कार्यक्रमात कोणताही बदल करण्याची मागणी आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) कडे करणार नाही असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ कसोटी क्रिकेटच्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचेल का, याचे भवितव्य भारत- इंग्लंड मालिकेच्या निकालावर ठरणार आहे.

निक हाॕकली यांनी म्हटलेय की क्रिकेट आॕस्ट्रेलियाचा हा दौरा व्हावा यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले पण दक्षिण आफ्रिकेतील परिस्थिती खूपच आव्हानात्मक आहे, वैद्यकीय सल्ल्याकडे दुर्लक्ष करणे अवघड आहे आणि त्यामुळे हा दौरा होऊ शकणार नसल्याचे आम्हाला खूप दुःख आहे. हल्ली परिस्थिती एवढी अस्थिर आहे की कोणत्याही गोष्टीची हमी देता येत नाही. सुदैवाने मायदेशी प्रकोप कमी होता. तरीसुध्दा मायदेशी खेळणे आव्हानास्पद होते.

दक्षिण आफ्रिकेत खेळण्यास नकार देण्याचे कारण सांगताना क्रिकेट आॕस्ट्रेलियाने कोरोनाच्या तेथील दुसऱ्या लाटेचे कारण दिले आहे आणि कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची आॕस्ट्रेलियन पथकातील कुणाला बाधा झाली तर …अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER