आता याच्यापुढे शिवसेना एकटी महाराष्ट्रावर भगवा फडकंवेलं – उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray1

मुंबई :- आज मी निर्णय घेतोय, आता याच्यापुढे शिवसेना एकटी महाराष्ट्रावर भगवा फडकवेलं. यापुढे युतीसाठी कोणाच्याही दारापुढे कटोरं घेऊन जाणार नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा असा एक व्हिडिओ सोशल मिडियावर वा-यासारखा पसरला आहे.

ठाकरेंचं हे विधान केवळ आणि केवळ भाजपपुरते न राहता आता ते कॉंग्रेस राष्ट्रवादीसाठीही लागू होत आहे. कारण, भाजप सोबत सत्तास्थापना करू न शकल्याने शिवसेनेनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर डोळेझाक विश्वास ठेवला होता. त्या विश्वासाच्या आधारावरंच मुख्यमंत्री शिवेसेनेचाच होणार अशी आरोळी ठेकण्यात आली होती. तशा सकारात्मक चर्चादेखील तीनही कॉंग्रेस राष्ट्रवादी शिवसेना पक्षांत सुरू होत्या. मात्र, आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमचा सत्तास्थआपनेशी काही संबंध नाही. तुम्ही भाजप शिवसेनेलाच विचारा असे खळबळजनक वक्तव्य केल्याने शिवसेनेचा आघाडीसोबतचा सत्तास्थापनेचा प्लान फिसकटला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या पार्श्वभूमिवर उद्धव ठाकरेंच्या या व्हिडीओला नेटक-यांनी विशेष महत्त्व दिले आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. लोकांनी भाजप – शिवसेना युतीला सत्तास्थापनेसाठी स्पष्ट कौलदेखील दिला. परंतु युतीत विधानसभा लढलेल्या भाजप – शिवसेनेत निकालानंतर वितुष्ट आले. हे वितुष्ट इतके विकोपाला गेले की, शिवसेनेनी भाजपची साथ सोडून सत्तास्थापनेसाठी विरोधी पक्ष कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसची मदत घेतली.


 

शिवसेनेला हिणवण्यासाठी भाजपला हा एक मुद्दा पुरेसा ठरला. शिवसेना आणि कॉंग्रेस दोन्ही विरूद्ध दिशेचे टोक आहेत. तरिही उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेससोबत घरोबा करण्याची रिस्क का घेतली हा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यातंच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यू टर्न घेऊन महाराष्ट्रातील सत्तास्थापनेविषयी भाजप – शिवसेनेलाच विचारा असे विधान करून मोठा बॉंम्बच टाकला आहे. या सगऴ्या पार्श्वभूमिवर शिवसेनेचा गेम झाल्याच्या चर्चांना सोशल मिडीयावर ऊत आला आहे.

तथापी, 2014 मध्ये शिवसेनेनी विधानसभा स्वबळावर लढली होती. मात्र, केंद्रात शिवसेनेचे मंत्री होते. केंद्रात सत्तेवर तर राज्यात विरोधी बाकावर अशी भूमिका शिवसेनेनी वठवली होती. दरम्यान, शिवसेनेनी भाजपवर वार करण्याची एकही संधी न दवडता सामनाच्या अग्रलेखातून वेळोवेळी भाजपवर शरसंधान साधले. त्यावेळी एका भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले होते, शिवसेना विधानसभेवर स्वबळावर भगवा फटकवेल परंतु युतीसाठी कोणाच्याही दारा कटोरं घेऊन जाणार नाही. त्यांचे हे भाषण आता सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले आहे.

युतीत धोका मिळाल्यानंतर शिवसेनेनी कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्यासाठी सकारात्मक पावले उचलली मात्र तेथेही सत्तास्तापनेत आमचा काही संबंधच नाही अशी भूमिका घेतल्याने शिवसेनेच्या पदरी निराशाच पडली आहे.