आता शर्लिन चोप्रानेही साजिद खानवर केला लैंगिक शोषणाचा आरोप

Sherlyn Chopra - Sajid Khan

दिग्दर्शक साजिद खानने (Sajid Khan) जिया खानला रिहर्सल सुरु असताना टॉप आणि ब्रा काढण्यास सांगितले होते असा आरोप जियाच्या बहिणीने करिश्माने बीबीसीच्या एका कार्यक्रमात केल्याचे आम्ही तुम्हाला सर्वप्रथम सांगितले होतेच. याच मुलाखतीत साजिदने तिच्यावरही कशी वाईट नजर टाकली होती तेसुद्धा करिश्माने सांगितले होते. करिश्माची ही गंभीर वक्तव्ये बॉलिवुडमध्ये (Bollywood) हंगामा करीत असतानाच आता अभिनेत्री शर्लिन चोप्रानेही (Sherlyn Chopra) साजिद खानवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. शर्लिनच्या या आरोपामुळे बॉलिवुडमध्ये पुन्हा एकदा मी टूचा मुद्दा उपस्थित झाला असून त्यावर आता चांगलाच गदारोळ होण्याची शक्यता दिसत आहे.

शर्लिन चोप्राने ट्विटच्या माध्यमातून साजिद खानवर आरोप केले आहेत. शर्लिनने लिहिले आहे, ‘माझ्या वडिलांच्या निधनावर काही दिवसांनी म्हणजे एप्रिल 2005 मध्ये मी साजिदला भेटले होते. तेव्हा त्याने माझ्याशी गैरवर्तणूक केली. मी तेव्हा त्याला म्हटले होते की, तुला काय पाहिजे ते मला ठाऊक आहे, पण मी त्यासाठी इथे आलेली नाही. तुला भेटण्यामागे माझा तो उद्देश्य नाही.

यावर एका फॅनने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शर्लिनने म्हटले आहे, ‘त्याच्याकडे त्याच्या चारित्र्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी अनेक सुपरस्टार्स आहेत. बॉलिवूडमध्ये माफियाचे एक मोठे सिंडिकेट आहे. असे म्हणत शर्लिनने पुढे लिहिले आहे, जर, तुम्हाला जॉनी सिन्स बनायचे आहे तर अवश्य बना. पण सिनेमात काम देण्याच्या निमित्ताने मुलींना घरी बोलावून त्यांच्याशी अश्लील चाळे करणे ही कुठली सभ्यता आहे? शर्लिनने तिचे हे ट्विट साजिद खानला टॅग केले असून त्यालाही प्रश्न विचारले आहेत. यावर साजिदने अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER