आता सरकारी डायऱ्या, कॅलेंडर छापण्यावर निर्बंध

नवी दिल्ली : कोविड -१९ (COVID-19) साथीच्या आजारामुळे सरकार आपला खर्च कमी करीत आहे. त्याअंतर्गत केंद्र सरकारने आता शासकीय छपाईची कामे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता कॅलेंडर्स, डायरी, शेड्यूलर आणि इतर सामग्रीचे मुद्रण विविध मंत्रालये, विभाग, सरकारी कंपन्या आणि बँका करणार नाहीत. अर्थ मंत्रालयाने याबाबत परिपत्रक काढले आहे.

वित्त मंत्रालयाने या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून यामध्ये डायरी, ग्रीटिंग्ज कार्ड्स, कॉफी टेबल बुक, कॅलेंडर्सच्या छपाईवर बंदी घातली आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशानुसार आता अशा सर्व वस्तू केवळ डिजिटल स्वरूपात देण्यात येतील. मंत्रालयाने सांगितले की ही मार्गदर्शक तत्त्वे तत्काळ अंमलात आणली जातील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER