आता रजनीकांत आणि अक्षयकुमारही येणार आमने-सामने

Now Rajinikanth and Akshay Kumar will also come face to face

2020 मध्ये अनेक सिनेमे तयार होऊन प्रदर्शित होणार होते. मोठ्या नायकांनी आणि मोठ्या निर्मात्यांनी त्यांचे सिनेमे रिलीज करण्यासाठी तारखाही निश्चित करून ठेवल्या होत्या. प्रत्येक मोठ्या कलाकाराने त्याच्या सिनेमासाठी सुट्ट्यांचा सीजन बुक करून टाकला होता. पण कोरोनामुळे त्यांच्या या सगळ्या योजना पाण्यात गेल्या. आता 2021 मध्ये सगळे सुरळीत होऊ लागले असून थिएटरही सुरु झाले आहेत. मात्र फक्त 50 तिकीट विक्रीचीच परवानगी असल्याने हिंदीतील मोठ्या स्टार्सनी आपले सिनेमे अजून रिलीज करण्याचा निर्णय घेतलेला नाही. मार्चनंतर थिएटर सुरळीत सुरु होतील या अपेक्षेने सगळ्यांनी त्यांच्या सिनेमाच्या डेट्स नक्की केल्या आहेत. पण यामुळे तिकीट खिडकीवर मोठ्या स्टार्सच्या सिनेमांची टक्कर होताना दिसणार आहे. 2.0 या सायफाय सिनेमात रजनीकांत (Rajinikanth) नायक होता तर अक्षयकुमार (AkshayKumar) खलनायक. सिनेमात जशी त्यांची टक्कर झाली तशीच आता बॉक्स ऑफिसवरही होणार आहे. रजनीकांत ने त्याचा बहुचर्चित ‘अन्नाथे’ सिनेमा रिलीज करण्याची तारीख घोषित केली आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी अक्षयकुमारनेही त्याच्या बहुचर्चित सिनेमा रिलीज करण्याचे ठरवले आहे.

रजनीकांत हा केवळ साऊथचा सुपरस्टार नसून देशभर आणि जगभर त्याचे फॅन्स पसरलेले आहेत. त्याच्या प्रत्येक सिनेमाला हाऊसफुलचा बोर्ड पहिल्या शोपासून असतो. त्याच्या प्रत्येक सिनेमाची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात असतात. ‘अन्नाथे’ हा रजनीकांतचा आगामी सिनेमा असून त्याने लॉकडाऊननंतर या सिनेमाचे शूटिंग सुरु केले. खरे तर गेल्या वर्षीच सिनेमाचे शूटिंग पूर्ण होणार होते पण कोरोनाने ते होऊ दिले नव्हते. या सिनेमाचे शूटिंग सुरु असून निर्मात्यांनी या सिनेमाच्या रिलीजची डेट जाहीर करून टाकली आहे. रजनीकांतचा हा सिनेमा दिवाळीत म्हणजे 4 नोव्हेंबरला रिलीज केला जाणार आहे. निर्मात्यांनी तारीख जाहीर करताना जी पोस्ट टाकली आहे त्यात 26 वर्षानंतर रजनीकांतचा सिनेमा दिवाळीत रिलीज होणार असल्याचेही म्हटले आहे. 26 वर्षांपूर्वी रजनीकांतचा ‘मुथु’ दिवाळीत रिलीज झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

याच दिवशी अक्षयकुमारनेही त्याचा ‘राम सेतु’ सिनेमा रिलीज करण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी अक्षयकुमारने त्याच्या या नव्या सिनेमाची घोषणा करतानाच सिनेमाच्या रिलीजची तारीखही 5 नोव्हेंबर असल्याचे जाहीर केले होते. ‘राम सेतु’चे लवकरच शूटिंग सुरु केले जाणार असून याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी ‘सूरज पे मंगल भारी’चा दिग्दर्शक अभिषेक शर्मावर सोपवली आहे. अक्षयचे चार सिनेमे तयार असून त्यांच्या रिलीजसाठी निर्माते योग्य वेळेची वाट पाहात आहेत.

अक्षयकुमारचे सिनमे बॉक्स ऑफिस वर हिट होत असले तरी रजनीकांतच्या तुलनेत त्याची लोकप्रियता तशी कमी आहे. हिंदी पट्ट्यातही रजनीकांतच्या फॅन्सची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे हिंदी पट्ट्यात अक्षयच्या ‘रामसेतु’ साठी रजनीकांतचा ‘अन्नाथे’ मोठे संकट उभे करू शकेल असे म्हटले जात आहे. रजनीकांच्या सिनेमाचे दिग्दर्शन शीवा करीत असून यात खुशबू, मीना आणि प्रकाश राज यांच्या भूमिका आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER