‘आता राजेंद्र शिगणेंकडे १०० कोटी वसुलीची जबाबदारी’, पडळकरांचा हल्लाबोल

Rajendra Shingne - Gopichand Padalkar

मुंबई : राज्यात एकीकडे करोनाने (Corona) हाहाकार माजवला आहे तर दुसरीकडे राजकीय वातावरणही चांगलंच तापू लागलेले आहे. ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकावर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर भाजपा (BJP) नेत्यांनी संताप व्यक्त केला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांना लक्ष्य केले जात आहे. आमदार गोपीचंद प़डळकर (Gopichand Padalkar) यांनी आपल्या अकार्यक्षमतेवर पांघरूण घालण्यासाठी ते भाजपावर बेछूट आरोप करत असल्याची टीका केली आहे.

नवाब मलिक ज्या गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तिथे काल एकाच दिवसात ॲाक्सिजन मिळाला नसल्याने १५ जणांचे निधन झाले. त्या रुग्णांच्या नातेवाईकांना आधार देण्याऐवजी, स्वत;चं पाप झाकण्यासाठी आपल्या अकार्यक्षमेतवर पांघरूण घालण्यासाठी ते भाजपावर खोटे आरोप करत आहेत. पण हा महाराष्ट्र आहे. नवाबभाई ये पब्लिक है सब जानती है, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधला.

आरोग्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेण्याऐवजी बघ्याची भूमिका घेत हात झटकले आहेत. ॲाक्सिजनअभावी महाराष्ट्रात एक पण मृत्यू झाले नाहीत असं वक्तव्य केलं आहे. ही कोणती संवेदनशीलता? असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला. मागच्या दीड वर्षांपासून पहिल्या फळीतील अथक परिश्रम घेणाऱ्या आरोग्य कर्मचारी व डॅाक्टरांशी साधी चर्चाही सरकार चर्चा करत नाही. कालच मला माहिती मिळाली आरोग्य कर्मचारी व डॅाक्टर संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. सगळ्या गोष्टी जनतेकडून अपेक्षित आहेत, पण सरकारचा कसलाही ॲक्शन प्लान नाही. या सरकारने बेशरमपणाचा कळस गाठला आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

पुढे ते म्हणाले की, नरेद्र मोदींनी (Narendra Modi) औषधांचा साठा करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले असून किंमती कमी केल्या आहेत. अशा संकटाच्या काळात जे उद्योजक महाराष्ट्रात रेमडेसिविरचा पुरवठा करण्यासाठी स्वत: पुढाकार घेत आहेत त्यांच्यावर पोलिसांच्या माध्यमातून कारवाई करण्याची योजना राज्य सराकारने आखली आहे. यातून आपला काय हेतू आहे हे दिसत आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणेंवर (Rajendra Shingne) आता शंभर कोटीचं वसुलीची जबाबदारी किंवा टार्गेट दिलं आहे असे मला वाटत आहे. महाराष्ट्र सरकार अपयशी ठरलं आहे म्हणून भाजपावर आरोप करत आहे, असंही ते म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button