आता प्रितम आणि धनंजय मुंडे आमने सामने, दोघेही म्हणतात विजय आमचाच

Pritam Munde - Dhananjay Munde

बीड : विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघासाठी आज (1 डिसेंबर) मतदान पार पडले. या निवडणुकीतील औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि भाजप (BJP) नेत्या प्रितम मुंडे (Pritam Munde) यांनी मतदान केले. यावेळी दोन्ही नेत्यांनी आमचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया दिली.

औरंगाबाद (मराठवाडा) पदवीधर मतदारसंघात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतिश चव्हाण (Satish Chavan) आणि भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यामध्ये चुरशीची लढत होती.

आतापर्यंत प्रामुख्याने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भांवंडांना आमने सामने आलेले पाहिले आहे. मात्र, आता पंकजा यांची प्रकृती ठीक नसल्याने प्रितम मुंडे यांना आमने सामने पाहायला मिळाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनजंय मुंडे यांनी बीडमधील परळी येथील गाढे पिंपळगाव येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतिश चव्हाण यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच सतिश चव्हाण हे पदवीधर मतदारसंघात हॅट्रिक साधतील, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

तर पदवीधर मतदार संघातील ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. कोरोना काळामध्ये मतदारांचा प्रतिसाद कसा मिळतो याबद्दल शंका होती. मात्र मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. गुलाल आमचाच असेल असा विश्वास खासदार पितम मुंडे यांनी व्यक्त केला. तर बंडखोर उमेदवार रमेश पोकळे यांनी निवडणुक लढ्यामुळे त्याचा निश्चितच परिणाम होईल, असे त्या म्हणाल्या

राज्यात शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीने अर्थातच महाविकासआघाडीने एकत्रित ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील या नव्या समीकरणांमुळे ही निवडणूक फार चुरशीची बनली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER