आता फक्त महिलांसाठी वेगळे दारूचे दुकान : कमलनाथ सरकारचा निर्णय

भोपाळ :- मध्य प्रदेश सरकारने फक्त महिलांसाठी वेगळे दारूचे दुकान सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. महिलांना कोणत्याही अडथळ्याशिवाय दारू खरेदी करता यावी यासाठी कमलनाथ सरकारने हा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात भोपाळ, इंदूर, जबलपूर आणि ग्वालियरमधून होणार आहे. या शहरांत प्रत्येकी एक-एक दुकान उघडण्यात येणार आहे.

दिल्ली हिंसाचारादरम्यान आप नगरसेवकाच्या घरात सापडल्या बंदुका, पेट्रोल बॉम्ब आणि दगडांचा ढीग

दिल्लीत तसेच इतर काही मेट्रो शहरांमध्ये अशाप्रकारे दुकाने आहेत. त्याच धर्तीवर मध्यप्रदेशातही अशी दुकाने उघडण्यात येणार आहेत. या दुकानात फक्त विदेशी दारू विकली जाणार आहे. विविध प्रकारच्या वाईन आणि व्हिस्कीचे विविध ब्रँड या ठिकाणी असणार आहेत. या दुकानात विकल्या जाणा-या कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही. कारण देशामध्ये आयात होण्याआधीच हे अतिरिक्त शुल्क वसून करण्यात येते. राज्यात महाग दारूचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि त्यातून नफा कमावण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. कमर्शिअल टॅक्स डिपार्टमेंटचे अडिशनल चीफ सेक्रेटरी आयसीपी केशरी यांनी दिलेल्या माहितीनुसार जे ब्रँड मध्यप्रदेशात मिळत नाही, ते ब्रँड या दुकानांमध्ये असणार आहेत. त्यामुळे महिलांना दारू खरेदी करणं अधिक सुकर होणार आहे.