‘आता ओबीसीचाच मुख्यमंत्री हवा !’ ओबीसींच्या मोर्च्यात निर्धार

OBC Community Protest

जालना : ओबीसी समाजाची (OBC Community) स्वतंत्रपणे जनगणना व्हावी, या मागणीसाठी रविवारी जालन्यात ओबीसी संघटनांच्यावतीने महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. या महामोर्च्यात  अनेक प्रमुख ओबीसी नेते सहभागी झाले होते. यावेळी मोर्चेकऱ्यांनी ‘आता मुख्यमंत्री ओबीसीचाच’ असे बॅनर्स झळकावले. तसेच आगामी काळात या मुद्द्यावरून आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला.सुरुवातीला या मोर्च्याला  पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. मात्र, नंतर मोर्चा काढण्यास सशर्त परवानगी देण्यात आली.

या मोर्च्यात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)  सहभागी   झाले होते. त्यांच्या हस्तक्षेपामुळेच पोलिसांनी मोर्च्याला  परवानगी दिली. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावाल तर सगळा ओबीसी समाज एकत्र आहे, असा इशारा यावेळी विजय वडेट्टीवार यांनी दिला. हा मोर्चा कोणाच्या विरोधात नाही. कोणाची जिरवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला नाही. मात्र आमच्या मुळावर कोणी आले तर नक्कीच जिरवणार. हा मोर्चा आमच्या हक्कासाठी काढला आहे. मी हे प्रश्न सातत्याने मांडत आहे.

मी पक्ष, धर्म, जातपात सोडून  फक्त ओबीसींचा प्रतिनिधी म्हणून लढत आहे. ओबीसींच्या हक्कासाठी काहीही करण्याची गरज पडली तर मागे हटणार नाही. संघर्षाची लढाई करताना कशाचीही पर्वा नाही, ही प्रेरणा गोपीनाथ मुंढे यांच्याकडून मिळाली.  ते आज हयात नाहीत, त्यांनी केलेल्या संघर्षाला सलाम केलं पाहिजे.  भुजबळ यांनीही धुरा हाती घेतली.  तेही लढत राहिले.  हे ओबीसींच्या हक्कसाठी लढणारे नेते आहेत, असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. ओबीसीची स्वतंत्र जनगणना होत नसेल तर मी मुख्यमंत्री आणि मोदीसाहेब यांना विनंती करणार आहे. विधानसभेत स्वतंत्र जनगणनेचा प्रस्ताव मी मांडणार आहे. पक्षाच्या पलीकडे लढाई जात नाही तोपर्यंत यश मिळणार नाही, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER