नागरीकांच्या उत्तम आरोग्यासाठी उत्तर कोरियाचा अनोखा उपक्रम, वैज्ञानिक प्रक्रिया केलेल्या भाजीपाला लागवडीकडे झेप

North Korea produces functional vegetables to improve peoples diet

“सुरक्षित राहा, निरोगी रहा”, हाच मंत्र आता सगळीकडे प्रचलित आहे. आणि उत्तर कोरियाने आता हा मंत्र त्यांच्या जीवनात अंमलात आणण्यासाठी एक वेगळा प्रयेग करत आहेत. ते विज्ञानाच्या आधारावर विज्ञान संस्थेत उत्पादित ताजी आणि पौष्टिक भाजीपाल्याची म्हणजेच फंक्शनल भाज्या तयार करण्याचा उपक्रम राबवत आहेत. हे ऐकायला विचित्र वाटत असले तरी सध्याच्या काळात काहीही शक्य आहे असेच म्हणावे लागेल.

उत्तर कोरियामधील एक संस्था लोकांचा आहार आणि आरोग्य सुधारण्याच्या उद्देशाने विविध प्रकारच्या “फंक्शनल भाज्या” तयार करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

उत्तर कोरियाची अधिकृत बातमी एजन्सी केसीएनएचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत पियांगयांग भाजीपाला विज्ञान संस्थेत मिरपूड आणि टोमॅटो सारख्या वनस्पतींची देखभाल करताना दाखवण्यात आले आहे.

प्योंगयांग भाजीपाला विज्ञान संस्थेतील एक संशोधक, आयम बियॉंग सोप यांनी सांगितले की, साध्या बाहेरच्या भाज्यांपेक्षा फंक्शनल भाज्यांमध्ये लोहाचे प्रमाण अधिक आहे. बाळंतिण स्त्रि साठी या भाज्या अधिक उपयुक्त आहेत.

तसेच, ज्यांच्या शरीरात लोह खनिजाचे प्रमाण अत्यल्प असते त्यांच्यासाठी या फंक्शनल भाज्या अधिक पौष्टीक आहेत.

नुकतेच ग्यानुरा बायोकोलरमध्ये या भाज्या तयार करण्यात आल्यात त्यावरून हे निदान काढण्यात आले. तसेच, लोकांच्या उत्तम आरोग्यासाठी अशा भाज्यांचे उत्पन्न वाढवण्याकडे आमचा कल राहणार व अशा प्रकारचे नवनवीन संशोधन करत राहू असे आयम बियॉंग सोप यांनी सांगितले.

फंक्शनल भाज्या म्हणजे नेमके काय? –

डीपीआरकेच्या प्योंगयांग भाजीपाला विज्ञान संस्थेत उत्पादित ताजी आणि पौष्टिक भाजीपाल्याची मागणी नागरिकांमध्ये वाढत आहे.

फंक्शनल भाज्या तयार करणारी संस्था अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण आहे. ही संस्था संगणक-नियंत्रित हायड्रोपोनिक आहे. भींती मातीच्या आहेत. छत प्लास्टिक ग्रीन शिटचे आहे. अशी अल्ट्रा-आधुनिक बायोइन्जिनियरिंग संशोधन संस्था प्रक्रिया केलेल्या भाज्या उत्पादनासाठी सुसज्ज आहे.

उत्तर कोरियात लोकांचा आहार सुधारण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रक्रीया केलेल्या भाज्या मोठ्या प्रमाणात तयार झाल्या आहेत.

त्यापैकी लाल मिरची, टोमॅटो, काकडी, कोबी आणि गाजर यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

अध्यक्ष किम जोंग इल यांनी नागरिकांना चवदार आणि पौष्टिक भाज्या उपलब्ध करुन देण्यासाठी मनापासून प्रयत्न केले आहेत.

नव्या शतकाची गरज भागविण्यासाठी संस्थेच्या पुनर्रचनेत उद्भवलेल्या सर्व अडचणी किम जोंग उन यांनी दूर करून कोरीयन नागरिकांसाठी आरोग्यदायी भाजीपाला देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

ज्युचे त्यांच्या महान आयुष्यातील मागील वर्ष हे शेवटचे वर्ष ठरले. त्यांनी मार्च 2011 मध्येच या प्रक्रिया केलेल्या भाजी उत्पादन संस्थेला भेट दिली होती. ग्रीनहाऊसमध्ये विविध प्रकारच्या भाज्या वाढत असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले होते.

उत्तर कोरियातील सर्वोच्च नेते किम जोंग उन यांनी सप्टेंबर २०१२ आणि जुलै 2011 मध्ये या संस्थेला भेट दिली.

त्यानंतर या ग्रीनहाऊसमध्ये वैज्ञानिक तत्वावर प्रति हेक्टरी भाजीपाला उत्पादन वाढवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले.

केसीएनए या संस्नुथेनुसार फंक्शनल भाज्यांच्या उत्पादनासाठी बायोइन्जिनियरिंग संशोधन संस्था आता पूर्णपणे सुविधांनी सुसज्ज आहे. यूएन फूड एडच्या पुरवठ्यावर वर्षानुवर्षे अवलंबून असलेल्या देशासाठी अशा भाज्यांचा शोध लागणे व उत्पादन करणे कोरीयन लोकांसाठी आनंदाची बाब आहे. कोरोना साथीच्या विळख्यात कोरोनाही सापडला होता मात्र, आता कोरियाने कोरोनावर मात केल्याचा दावा कोरीयाने केला आहे.


Source:-North Korea’s official news agency KCNA

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला