आता राष्ट्रवादी काँग्रेसही म्हणाली, ‘राज ठाकरे भाजपसोबत जायला तयार’

Raj Thackeray & NCP

मुंबई : मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी वीजबिल दरवाढीच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मनसेने आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारमधील मंत्र्यांनी वीजबिल माफ करू म्हटले होते. पण चार पाच दिवसात माहिती पडलं अदानी शरद पवार यांच्या घरी जाऊन भेटून आले. आणि त्यानंतर सरकारने कोणतंही वीजबिल माफ करणार नाही, असं जाहीर केलं. हे सरकार वीज कंपन्यांना पाठिशी घालत आहे, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. राज ठाकरे यांनी आज नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हा आरोप केला.

राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरेंनी केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. आगामीनिवडणुका लक्षात घेता भाजपासोबत जाण्यासाठी राज ठाकरे तयार आहेत. त्यामुळे आज त्यांनी असं विधान केलं, अशी टीका मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे. तसेच शरद पवार यांचं नाव घेतल्याशिवाय बातम्या प्रसिद्ध होत नाही, असा टोला देखील नवाब मलिक यांनी लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER