आता खऱ्या अर्थाने नागपूर आणि मुंबई एक झाली आहे – मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray

मुंबई :- नागपूरमधील (Nagpur) नव्या विधीमंडळाच्या कार्यालयाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आज ऑनलाईन उद्घाटन पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला (BJP) चांगलेच टोले लगावले.

सध्या देशात माझ्याच हाती सर्व काही असं वातावरण आहे. असं असतानाही महाराष्ट्र मात्र केंद्रीकरणावर भर देत आहे. नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन काम करत आहे. विधीमंडळ इमारतीचं ऑनलाईनपद्धतीने होणारं उद्घाटनही त्याचाच एक भाग आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांचा नागपूरकरांशी हा संवाद सुरू असताना तांत्रिक कारणामुळे मध्येच माईक बंद झाला. तेव्हा नागपूरवाले मला मध्येच का म्यूट करत आहे, असा मिश्किल सवाल करत मुख्यमंत्र्यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं.

तसेच मुख्यमंत्री म्हणाले, नागपुरात आता कार्यालय सुरू झालंय. हे कार्यालय वर्षभर सुरू राहणार आहे. अनेक वर्षांपासून कार्यालय सुरू करण्याची मागणी होत होती. ती आज पूर्ण झाली याचा मला आनंद आहे, असं सांगतानाच आता खऱ्या अर्थाने नागपूर आणि मुंबई एक झाली आहे, असं ते म्हणाले. नागपूरच्या अधिवेशनातच आपण शेतकरी कर्जमुक्तीचा निर्णय घेतल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

विदर्भ महाराष्ट्राचं अविभाज्य अंग

नागपूर राज्याची उपराजधानी आहे याचा मला अभिमान आहे. विदर्भ महाराष्ट्राचं अविभाज्य अंग आहे. विदर्भ माझ्या हृदयात आहे. तुम्ही माझ्या हृदयाजवळ आहात. त्यामुळे तुमच्यावर कधीही अन्याय होऊ देणार नाही. कुणी जर अन्याय करत असेल तर आम्ही तुमच्यासाठी ढाल बनून उभे राहू, असंही त्यांनी सांगितलं.

ही बातमी पण वाचा : ही तर टाटा, बिर्लांची सेना!  ‘बीएसई’च्या दंडात्मक कारवाईवरून आशिष शेलारांचा शिवसेनेवर निशाणा 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER