आता मनसे नेत्या रूपाली पाटील यांच्या लेकीचीही कंगनाप्रकरणात उडी; थेट भाजपवर निशाणा

Rupali Thombre Patil

मुंबई : सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणापासून अभिनेत्री कंगना रणौत विशेष चर्चेत आहे. त्यातच कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मीर संबोधल्यानंतर तर कंगना अधिकच गाजली. या प्रकरणानंतर कंगना विरुद्ध शिवसेना असेच युद्ध पाहायला मिळाले. कंगनाच्या ऑफिसवरदेखील हा राग निघाला असे म्हणण्यास हरकत नाही, अशी स्थिती होती. त्यानंतर शिवसेनेने कंगनाबाबत सावध भूमिका घेत कंगना विषय आमच्यासाठी संपला असल्याचे सांगितले.

आता या प्रकरणात मनसे नेत्या रूपाली पाटील यांच्या कन्येने उडी घेतली आहे. ‘जी कंगना आमच्या मुंबईत येऊन मुंबईला पाकिस्तान बोलती, वरून तिला भाजप साथ देतं ह्यांना जनाची नाही तर मनाची लाज आहे का नाही?’ अशा शब्दांत मनसेच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली पाटील यांच्या लेकीने भाजपवर टीका केली आहे.

‘आमच्या महाराष्ट्रात येऊन खाऊन पिऊन मोठी झाली. ज्या ताटात तू खातीस त्याच ताटात तू घाण करतीस, हीच का बाई तुझी पद्धत, पुन्हा आमच्या मुंबईकडे वाईट नजरेने पाहिलं तर गाठ आमच्याशी आहे.’ असं म्हणत पाटील यांच्या लेकीने कंगनाला इशारा दिला आहे. या संदर्भात स्वत: पाटील यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला असून आमच्या लहान मराठी लेकीलाही समजते राव, असं त्यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER