आता आमदार निलेश लंकेची पत्रकरांसाठी धडपड ; पत्रकार बांधवांचा कोरोना योद्धा श्रेणीत समावेश करावा , मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

Maharashtra Today

पारनेर : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे (Corona) संकट वाढले आहे . या संकटमय काळात राज्यातील सर्व पत्रकार बांधव आपला जीव धोक्यात घालून पत्रकारितेचे( Journalist) काम करत आहे. कोरोनाच्या या महामारीत राज्यात आता पर्यंत ५० हुन अधिक माध्यम प्रतिनिधींचा मृत्यू झाला आहे. यापार्श्वभूमीवर पत्रकार बांधवांचा कोरोना योद्धा श्रेणीत समावेश करावा, अशा विनंतीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि उपमुख्यामंत्री अजित पावर(Ajit Pawar) यांना लिहिले आहे .

मी असुरक्षित असलो तरी चालेल परंतु माझी मायबाप जनता सुरक्षित असली पाहिजे जणू असे ब्रीदवाक्यच घेऊन कोरोनाच्या संकट काळात मतदार संघाबरोबरच शेजारील तालुक्यांच्या रुग्णसेवेसाठी अहोरात्र झटणारे आमदार निलेश लंके यांनी आता राज्यातील पत्रकारांचीही काळजी घेतली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत आमदार निलेश लंके यांनी मतदार संघाबरोबरच परप्रांतीय कामगारांना जेवण, राहण्याची व्यवस्था तसेच थेट त्यांच्या गावी पोहचविण्याची सोय केली होती. याच दरम्यान कर्जुले हर्या येथे उभारलेल्या कोव्हिड सेंटरमधून सुमारे साडेचार हजार रुग्णांना उपचार करत त्यांना बरे केले होते. आत्ताच्या दुसऱ्या लाटेतही आमदार लंके यांनी भाळवणी येथे अकराशे बेडचे शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर सुरू केले आहे.यासाठी देश-विदेशातून देणगीचा ओघही सुरू आहे.दिवसभरातील 20 तास स्वतः आमदार लंके या सेंटरवर रुग्ण सेवेसाठी कार्यरत आहेत.रुग्णांची काळजी घेण्याबरोबरच कोरोना काळात कोव्हिड योध्दा म्हणून काम करणाऱ्या राज्यातील पत्रकारांची देखील त्यांनी काळजी घेतली आहे.या संदर्भात आमदार लंके यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी पत्रव्यवहार करून पत्रकारांनाही कोरोना योद्धा श्रेणीत समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.
सध्याच्या कोरोनाच्या या संकट समयी महाराष्ट्र राज्यातील सर्व पत्रकार बांधव आपला जीव धोक्यात घालून पत्रकारितेचे काम करत आहे. कोरोनाच्या या महामारीत राज्यात आता पर्यंत ५० हुन अधिक माध्यम प्रतिनिधींचा मृत्यू झाला आहे.तसेच नगर जिल्हयातील पांडूरंग रायकर,अशोक तुपे,सोपानराव दरंदले,अशोक सदाफळ,गनीभाई शेख या माध्यम प्रतिनिधी व पत्रकारांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

तरी अधिस्वीकृती धारकासह इतर वर्तमानपत्रात काम करणाऱ्या शहरी व ग्रामीण भागातील सर्व पत्रकार बांधवांचा पश्चिमबंगाल,पंजाब,ओडीसा,तामिळनाडू,मध्यप्रदेश व बिहार राज्यात ज्या प्रमाणे पत्रकार बांधवांचा कोरोना योद्धा श्रेणीत समावेश करण्यात आला आहे.त्याच प्रमाणे आपल्या महाराष्ट्रातील सर्व पत्रकार बांधवांचा सुद्धा कोरोना योद्धा श्रेणीत समावेश करून त्यांना विमा कवच मिळावे तसेच कोव्हॅक्सीन लसीकरणात प्राधान्य देऊन सहकार्य करावे ही विनंती, असे लंके यांनी पत्रात म्हटले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button