आता राज्य सरकारी कार्यालयात मराठी आवश्यक, आदेश जारी

uddhav thackeray

मुंबई : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारने राज्यातील स्थानिक भाषेला चालना देण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. आता सर्व कर्मचाऱ्यांना मराठी भाषा वापरावी लागेल. महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भात सर्व कर्मचाऱ्यांना आदेश जारी केले आहेत, ज्यात म्हटले आहे की, जर त्यांनी मराठी भाषा वापरली नाही तर कर्मचाऱ्यांची पगारवाढ थांबवली जाईल. महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना यापूर्वीच मराठी विचारसरणीला चालना देण्याच्या बाजूने आहे.

आता राज्यात सत्ता स्थापनेच्या काही दिवसांनंतरच उद्धव ठाकरे सरकारने या दिशेने पावले उचलले आहे. सर्व सरकारी कार्यालये, मंत्रालये, विभागीय कार्यालये आणि नागरी कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा अधिकृत वापर करण्यासाठी परिपत्रक जारी केले आहे. हे विभाग स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हाताळत आहेत. सामान्य प्रशासन विभाग परिपत्रकात स्पष्टपणे सांगितले आहे की, सर्व सरकारी कार्यालये, मंत्रालये, विभागीय कार्यालये आणि संस्था कार्यालयात अधिकृत वापरासाठी केवळ मराठी भाषा वापरली पाहिजेत. असे न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ताकीद दिली जाईल किंवा गोपनीय अहवालात याची नोंद असेल किंवा त्यांची पगारवाढ एक वर्षासाठी थांबवली जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER