…आता महाविकास आघाडीची झोप उडवणार- आशिष शेलार

CM Uddhav Thackeray-Ashish Shelar

मुंबई :- राज्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीची झोप उडवणार, असे भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी म्हटले आहे. विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पक्षाने आत्मचिंतन केले आहे. त्याचे प्रतिबिंब राज्यात लवकरच दिसेल, असेही ते म्हणाले. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यात गीता पठण व वंदे मातरम गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शेलार बोलत होते.

एकीकडे कायम हिंदुत्वाची कास धरलेल्या शिवसेनेने अजान स्पर्धा घेतली तर दुसरीकडे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधत ठाणे भाजपतर्फे गीता पठणाची स्पर्धा ठेवण्यात आली. यावरुन खरा हिंदुत्ववादी पक्ष कोणता हे स्पष्ट झालं आहे. शिवसेना अजान स्पर्धा आयोजित करते, तर भाजपने ठिकठिकाणी गीता पठण आणि वंदे मातरम गायनाचे आयोजन करुन राष्ट्रभक्तीच्या दृष्कीकोनातून एक पाऊल पुढे टाकले आहे. यातून शिवसेनेने थोडीशी अक्कल घ्यावी, असा टोला शेलारांनी शिवसेनेला लगावला.

ही बातमी पण वाचा : ‘विरोधी पक्षाची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी’, शिवसेनेची काँग्रेसवर खोचक टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER