आता खडसेंनी शिवसेनेत यावं, शिवसेनेच्या मंत्र्याकडून खुली ऑफर

Abdul Sattar-Eknath Khadse

औरंगाबाद : मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून माझे नाव समोर आल्याने मला संपविण्याचा प्रयत्न केला गेला असा गंभीर आरोप भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आपल्या सहकाऱ्यांवर केला आहे. त्यामुळे एकनाथ खडसे आद्यपही नाराज असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. त्यातच आता शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी भाजप (BJP) नेते एकनाथ खडसे यांना शिवसेनेत सामील होण्याची खुली ऑफर दिली आहे.

त्यांनी एकनाथ खडसे यांना बाहुबलीची उपमा दिली आहे. कटप्पाने बाहुबलीला का मारले? हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे खडसे यांचं काय झालं ते वेगळं सांगायला नको. त्यांनी आता भाजपला रामराम ठोकून शिवसेनेत यायला हवं. आम्ही त्यांचे स्वागत करु, असं अब्दुल सत्तार म्हणाले.

एकनाथ खडसे यांच्यावर भाजपमध्ये खरंच मोठा अन्याय झाला आहे. त्यामुळेच शिवसेना आणि भाजपची युती तुटली. आता खडसेंनी आमच्याकडे यावं. हवं तर मी मध्यस्ती करेन. त्यांच्यासारख्या अनुभवी नेत्याची शिवसेनेलाही मोठी मदत होईल. एकनाथ खडसेंची राजकीय कारकिर्दी कधीही संपणार नाही. राजकारणात एखादा अपघात होतो आणि त्या अपघाताने एखादा माणूस मागे पडतो. मात्र खडसे यांच्यावर भाजपमध्ये खरंच अन्याय झाला आहे. मात्र त्यांचं भवितव्य चांगलं आहे. त्यांनी शिवसेनेत यावं. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे त्यांच्याबाबत निश्चित बोलू, असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.

ही बातमी पण वाचा : विधिरत्न राम कदम यांना केंद्र आणि राज्य सरकारमधला फरक कळत नाही- अनिल परब

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER