आता काश्मिराने पोस्ट लिहून अप्रत्यक्षपणे गोविंदावर केला प्रहार

Kashmera - Govinda

विनोदी अभिनेता कृष्णा (Krushna Abhishek) आणि त्याचा मामा अभिनेता गोविंदा (Govinda) यांच्यात वितुष्ट आल्याचे आम्ही तुम्हाला सांगितले होतेच. याबाबत कृष्णाने मुलाखत देऊन गोविंदावर टीका केल्यानंतर गोविंदाने कृष्णाला तसेच सडेतोड उत्तर देत घरातील भांडणे घरातच सोडवायची असतात असा सल्ला दिला. तसेच त्याची पत्नी काश्मिरावरही अप्रत्यक्षपणे टीका केली होती. हॉस्पिटलमध्ये असलेल्या कृष्णाच्या मुलांना गोविंदा भेटायला गेला तेव्हा काश्मिराने त्यांना भेटू दिले नव्हते असेही गोविंदाने म्हटले होते.

यावर आता काश्मिराने एक पोस्ट लिहून वेगळ्या प्रकारे उत्तर दिले आहे. या पोस्टमध्ये तिने गोविंदाचे नाव घेतले नसले तरी त्याचा रोख गोविंदाकडेच आहे हे स्पष्टपणे दिसून येते.

काश्मिराने (Kashmera) पोस्टमध्ये मुलासोबत एक फोटो टाकला असून एक आई मुलासाठी काय काय करते ते लिहिले आहे. काश्मिराने लिहिले आहे, कोणत्याही नियम आणि मार्गदर्शनाविना नवा जीव येत असला तरी आईसोबत मात्र नियम आणि आणि मार्गदर्शन येते. आणि

एक आई असल्याने मुलाचे रक्षण करणे आणि माझ्या प्रायॉरिटीमध्ये मुलांना सर्वप्रतम ठेवणे हे माझे कर्तव्य आहे. एक आई असल्याने तुला कोणतेही नुकसान होऊ न देणे हेसुद्धा माझे कर्तव्य आहे. जेव्हा तुला त्रास होतो तेव्हा मी दुःखी होते. ज्या गोष्टींमुळे तुला दुःख आणि त्रास होतो त्या गोष्टी तुझ्यापासून दूर करते. एक आई असल्याने मी तुला वचन देते की, मी लोकांच्या त्या अजेंड्यासाठी तुझा वापर करू देणार नाही. मी जोपर्यंत जीवंत आहे तोपर्यंत या स्वार्थी जगापासून मी तुझे रक्षण करीन. तुझी आई.

काश्मिराची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली असून या पोस्टमुळे गोविंदा आणि कृष्णा परत जवळ येण्याची शक्यता मावळल्याचे म्हटले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER