आता करण जोहरने मुलांच्या संगोपनावर लिहिले पुस्तक

Karan Johar

प्रख्यात निर्माता, दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) मुलांचे संगोपन कसे करावे याची माहिती देणारे एक पुस्तक लिहिले आहे. स्वतः करणनेच सोशल मीडियावर एक व्हिडियो अपलोड करीत याची माहिती दिली आहे. लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात करणने हिरू आणि यश या आपल्या दोन मुलांसोबत भरपूर वेळ घालवला. त्यावेळी त्याला आलेल्या अनुभवावर त्याने ‘द बिग थॉट ऑफ अ लिटिल लव्ह’ नावाने एक पुस्तक लिहिले आहे. कार्टूनचा वापर करून करणने कथानक सादर केले आहे. या पुस्तकावर त्याच्या मुलांच्या विनोदी प्रतिक्रियेचा व्हिडियो करणने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

करणने यापूर्वी ‘अॅन अनसूटेबल बॉय’ नावाने आत्मचरित्र लिहिले असून ते प्रचंड लोकप्रिय झालेले आहे. त्यानंतर आता त्याने हे दुसरे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे लवकरच प्रकाशन केले जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER