आता कंगनाकडून मुंबईची तुलना थेट पाकिस्तानशी

Kangana Ranaut

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) मुंबईची तुलना पाकव्याप्त (Pakistan) काश्मीरसोबत केल्यानंतर तिच्याविरोधात सर्व स्तरांतून टीका  केली. तिच्या या वक्तव्याचा निषेधही व्यक्त करण्यात आला. परंतु, आता कंगनाने मुंबईचा (Mumbai) थेट पाकिस्तान असा उल्लेख केला आहे. आज मुंबई महापालिकेने (BMC) कंगनाच्या वांद्रे येथील कार्यालयावर अतिक्रमणाची कारवाई केली. कार्यालयातील १२ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईचे फोटो ट्विट  करत कंगनाने ‘पाकिस्तान’ असं कॅप्शन दिलं आहे. दरम्यान, कंगनाच्या कार्यालयावर केली जाणारी कारवाई मुंबई महानगरपालिकेकडून तूर्तास थांबवली आहे.

कंगना रणौतने तिच्या कार्यालयाच्या आतमध्ये केल्या जाणाऱ्या तोडक कारवाईचे फोटो ट्विट  करून ‘पाकिस्तान’ असं कॅप्शन दिलं आहे. शिवाय #deathofdemocracy हा हॅशटॅगही वापरला आहे. कंगनाने ट्विटची मालिका सुरूच ठेवली आहे. आधी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत करणाऱ्या कंगनाने महापालिकेच्या कारवाईनंतर आता थेट मुंबईला ‘पाकिस्तान’  म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER