‘आता गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं’, पंकजा मुंडे संतापल्या

Pankaja Munde

बीड :- ऑभाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी सावरगाव इथल्या भगवान भक्ती गडावर घेतलेल्या मेळाव्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. यानंतर पंकजा मुंडे यांनी याबाब त ट्विटरवर संताप व्यक्त केला आहे. “गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं आहे,” असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट इथे ऑनलाईन दसरा मेळावा घेतला होता. परंतु अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये ४० ते ५० जणांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांच्यासह महादेव जानकर, खासदार भागवत कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांच्यासोबत उपस्थित असलेल्या लोकांनी कोणतंही सोशल डिस्टन्स पाळलं नाही. आपत्ती व्यवस्थापना संदर्भात घालून दिलेल्या नियमांचे पालन त्यांनी केले नाही, असा आरोप त्यांच्यावर आहे.

याबाबत पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणाल्या आहेत की, ‘मी अतिवृष्टीची पाहणी केली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, अनेक नेते दौऱ्यात अनेक जिल्ह्यात होते. परवानगी घेऊन दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेले असतां गुन्हा दाखल झाल्याची बातमी पहिली. कार्यकर्त्यांच्या नंतर हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं आहे’.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER