‘आता बास झाले!’ जनतेच्या हितासाठी सोमवारपासून मनसेचा रेल्वे प्रवास

Raj Thackeray-Train

मुंबई : एसटी (ST) आधीच तोट्यात होती. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीत आणखी तोट्यात गेली. त्यामुळे आता एसटी पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली होती. त्यानुसार शुक्रवारपासून त्याची अंमलबजावणी झाली. मात्र मुंबईसह उपनगरात राहणाऱ्या नोकरदारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लोकलशिवाय दुसरा पर्याय नाही असे म्हणत, लोकहितासाठी येत्या सोमवारपासून मनसेचे (MNS) कार्यकर्ते लोकलने प्रवास करण्यास सुरुवात करेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्य आणि केंद्र सरकारला दिला आहे.

मनसेकडून अधिकृतपणे याची घोषणा पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केली. ते म्हणाले की, राज्यात पूर्ण क्षमतेने एसटीची सेवा सुरु झाली आहे. मात्र नोकरदारांना पालघर, अंबरनाथ, बदलापूरसारख्या शहरातून मुंबईला यायला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नोकरदारांना तासंतास बसची वाट बघावी लागत आहे. त्यांना लोकल प्रवास हाच योग्य पर्याय आहे. सामान्य नागरिकांना लोकलने प्रवास करण्याची मुभा द्यावी यासाठी मनसेकडून अनेकदा राज्य आणि केंद्र सरकारला निवेदने देण्यात आली. मात्र याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे आता बास झाले, जनतेच्या हितासाठी सविनय कायदे भंग करू. येत्या सोमवारपासून जनतेच्या हितासाठी मनसे रेल्वे प्रवासाला सुरूवात करणार आहे, अशी माहिती देशपांडे यांनी मनसेचा वतीने दिली आहे.

ही बातमी पण वाचा :  ‘जबाबदारी घ्यायलाच तुम्हाला सरकारमध्ये बसवलं, हे लक्षात असू द्या’ – मनसे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER