आता घरातही मास्क लावण्याची वेळ; केंद्राने केले सावध

Coronavirus - Mask

नवी दिल्ली : सध्या देशात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. केंद्र सरकारने (Central Government) आज कोरोनाची ही दुसरी लाट अत्यंत भयंकर असून आता घरातही मास्क लावण्याची वेळ आल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे देशातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं उघड होत आहे. केंद्र सरकारने कोरोनाच्या वाढत्या संसर्गावरून देशवासीयांना सचेत केलं आहे. कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयंकर आहे. त्यामुळे आता घरातही मास्क लावण्याची वेळ आली आहे, असं केंद्रानं म्हटलं आहे.

महिलांनी मासिक पाळीत लस घेऊ नये, त्यामुळे विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. अशा आशयाचे मेसेज गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावरही केंद्रानं स्पष्टीकरण दिलं आहे. मासिक पाळीतही महिला इंजेक्शन घेऊ शकतात. ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे, असं केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

तसेच राज्यांमध्ये पाठवण्यात येणाऱ्या ऑक्सिजन टँकर्समध्ये जीपीएस प्रणाली लावण्यात आली आहे. या टँकर्सवर सरकारचे संपूर्ण लक्ष आहे. शक्य तितक्या लवकर रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा वेळी नागरिकांनी आणि रुग्णांनी पोटावर झोपून श्वसनाचा व्यायाम करावा, अशी सूचनाही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शन हे संजीवनी नाही. रेमडेसिवीरला रामबाण औषध किंवा संजीवनी आहे, असं मानण्याचं कारण नाही. तो तुमचा गैरसमज असेल. त्यामुळे या इंजेक्शनचा साठा करणं योग्य नाही. कोरोनाच्या संसर्गाच्या सुरुवातीला रेमडेसिवीर घेतल्याने काहीही फायदा होत नाही. सौम्य लक्षणे असतील तर इतर सपोर्टिव्ह ट्रीटमेंटनेही रुग्ण बरा होतो. काढा, घरगुती उपाय, वाफ घेणे, गुळणी करणे आदी गोष्टी केल्यानेही कोरोनाची सौम्य लक्षणे असलेला रुग्ण बरा होतो. त्यामुळे घाबरून जाऊ नका, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button