आता बॉलिवूडचा ‘सिंघम’ मैदानात; अजय देवगणने धारावीतील ७०० कुटुंबांची घेतली जबाबदारी

Ajay Devgan

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या हजारो स्थलांतरित मजुरांना सोनू सूदने स्वखर्चाने मैदानात उतरून मदत केली. लाखो मजुरांनी त्याला आशीर्वाद दिला. त्यानंतर आता बॉलिवूडचा सिंघमसुद्धा कोरोनाच्या संकटात सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी मैदानात उतरला आहे.

अजय देवगणने आशियाच्या सर्वांत मोठ्या झोपडपट्टीची जबाबदारी घेतली आहे. धारावीतील ७०० कुटुंबांच्या मदतीसाठी तो समोर आला आहे. अजयने ट्विट करत ही माहिती दिली आहे. शिवाय लोकांनाही या कामी मदत करण्याचे आवाहन केले आहे.

ही बातमी पण वाचा : अभिनेता अक्षय कुमार खऱ्या आयुष्यात बनला पॅडमॅन ;लॉकडाउनच्या काळात वाटतोय महिलांना सॅनिटरी नॅपकिन

‘धारावी कोव्हिडी-१९चे मुख्य केंद्र बनले आहे. अनेक लोक एमसीजीएमच्या मदतीने दिवसरात्र काम करत आहेत. अनेक एनजीओ धारावीतील गरजूंना राशन व हायजीन किट्सचे वाटप करत आहे. आम्ही ७०० कुटुंबांना मदत करत आहोत. तुम्हीही यात योगदान देऊ शकता.’ असे ट्विट अजय देवगणने केले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER