आता मला पम्मी म्हणायचं

apurva nemlekar

एखादा कलाकार जेव्हा मालिकेमध्ये भूमिका साकारतो तेव्हा त्या कलाकाराला त्याच्या स्वतःच्या नावाने ओळखण्या पेक्षा प्रेक्षक त्या मालिकेतील नावानेच ओळखायला लागतात. अर्थात या सगळ्याची कलाकारांना देखील सवय असतेच. पण ती मालिका संपल्यानंतर तरी जेव्हा दुसरी मालिका सुरू होते त्यावेळी तरी लोकांनी आपल्याला नव्या नावाने ओळखावे अशी कलाकारांची इच्छा असते. असेच काहीसे झाले आहे रात्रीस खेळ चाले फेम अपूर्वा नेमळेकर हिच्या बाबतीत. खरे तर ती आता शेवंता या भूमिकेतून बाहेर पडून तुमच आमचं जमतंय नव्या मालिकेत पम्मी ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेचे शूटिंग देखील अहमदनगर मध्ये सुरू झाले. मात्र या शूटिंगच्या ग्रुप मधील सगळे लोक तिला शेवंता याच नावाने हाक मारत होते. शेवटी अपूर्वाला या सगळ्यांना ताकीद द्यावी लागली की आता तरी मला पम्मी या नावाने हाक मारा.

रात्रीस खेळ चाले या मालिकेचा दुसरा भाग देखील पहिल्या भागाप्रमाणेच गाजला. पहिल्या भागा नंतर आलेला भाग खर्‍या अर्थाने गाजवला तो शेवंता या व्यक्तिरेखेने. अण्णा नाईक यांच्या आयुष्यातील ही दुसरी स्त्री. आजपर्यंत आपण दोघात तिसरा या मध्यवर्ती संकल्पनेवर अनेक कथा रचलेल्या पाहिल्या आहेत. नाटक मालिका सिनेमा या तीनही माध्यमांमध्ये नवरा-बायकोच्या मध्ये खो घालणारी दुसरी बाई नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिली आहेत .

रात्रीस खेळ चाले या मालिकेमध्ये शेवंता हे पात्र देखील असंच होतं. खरंतर या भूमिकेला अपूर्वा नेमळेकर हिने तिच्या अभिनयामुळे जास्त लोकप्रिय केले. ही मालिका संपली आणि काही दिवसातच आपण नव्या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येत असल्याचे अपूर्वा ने तिच्या सोशल मीडिया पेज वरून जाहीर केले. ही मालिका होती तुमचं आमचं जमतंय. सध्या ही मालिका ऑन एअर आली नसली तरी अहमदनगरमध्ये या मालिकेचा सेट लागला असून सगळी टीम या ठिकाणी शूटिंग करत आहे. या नव्या मालिकेत अपूर्वा ही पम्मी यानावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पम्मी ला नटायला खूप आवडत असल्याचे तिच्या एकूणच लूकमधून दिसत आहे. त्यामुळे सतत ती या मालिकेत टकाटक दिसणार आहे.

अंकशास्त्रवर प्रचंड विश्वास असल्याने पम्मीच्या पाठीवर तिच्या नावाचा टॅटू देखील तिने अंकशास्त्र च्या नियमानुसार काढला आहे. नगरमध्ये सध्या अपूर्वा या मालिकेच्या शूटिंगसाठी आली असून सध्या काही प्रोमो आणि एपिसोड बँक तयार करण्याचे काम सुरू आहे. या मालिकेची संपूर्ण टीम एकत्र आहे. मालिकेच्या सेटवर अपूर्वाला सगळे टीम मेंबर सतत शेवंता या नावाने हाक मारत असतात. सुरुवातीला अपुर्वाला असं वाटलं की शेवंता ही व्यक्तिरेखा लोकप्रिय असल्याने सगळेजण याच नावाने तिला बोलवत असावेत. पण नंतर तिला असं झालं की कलाकार म्हणून एका व्यक्तिरेखेतून बाहेर पडून दुसऱ्या व्यक्तिरेखेचे मध्ये शिरता येणे हे कलाकाराचे कौशल्य असतं पण आता शेवंता ला मागे टाकून तिला पुढे जायचं आहे.

आणि त्यासाठी यापुढे तिला पम्मी या नावानेच लोकांनी अधिकाधिक ओळखावं असं वाटतं ..याची सुरुवात तुमच आमचं जमतंय या मालिकेच्या सेटवर असलेल्या टीम कडूनच व्हायला हवी म्हणून एक दिवस तिने गंमतीत सगळ्यांना ताकीद दिली की इथून पुढे मला तुम्ही एकतर अपूर्वा किंवा पम्मी या नावाने हाक मारा. मालिका हिट व्हायला पाहिजे असेल तर त्यासोबत या मालिकेतल माझं नाव देखील लोकप्रिय व्हायला पाहिजे असं मलाही वाटतं आता तिचा हा सल्ला तुमच आमचं जमतंय या दिशा नव्या मालिकेतील सगळे क्रू मेंबर किती अमलात आणतात यावरती पम्मी म्हणून लवकर सेट होईल. तूर्तास अपूर्वा च्या पम्मीला शुभेच्छा आणि लवकरच या नावाने देखील ओळखली जावी असं तिच्या चाहत्यां ना वाटतयं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER