आता गोविंदालाही झाली कोरोनाची लागण

Govinda

कोरोनाची (Corona virus) ची दुसरी लाट बॉलिवूडकरांना फार महाग पडू लागली आहे. गेल्या काही दिवसात बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातच राज्य सरकारने नुकतीच सुरु झालेली थिएटर्सही बंद करण्याचा निर्णय घेतल्याने जे सिनेमे या महिन्यात रिलीज होणार होते ते आता पुढे ढकलावे लागणार आहेत. ३० एप्रिलला अक्षयकुमारचा (Akshay Kumar) बहुचर्चित ‘सूर्यवंशी’ रिलीज केला जाणार होता, पण आता त्याच्यावरही टांगती तलवार आहे. सरकारने शूटिंग सुरु ठेवण्याची परवानगी दिली हा त्यातल्या त्यात दिलासा असला तरी कलाकारांना कोरोनाची लागण होऊ लागल्याने शूटिंग कसे करणार असा प्रश्न निर्मात्यांपुढे उभा ठाकला आहे.

बॉलिवूडमध्ये कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत रणबीर कपूर, संजय लीला भंसाळी, आमिर खान, आर. माधवन, मनोज वाजपेयी, बप्पी लाहिरी, सतीश कौशिक, आलिया भट्ट, मिलिंद सोमण, कार्तिक आर्यन, सिद्धांत चतुर्वेदी, तारा सुतारिया, रमेश तौरानी यांना कोरोनाची लागण झाली. कोरोनाग्रस्त कलाकारांच्या यादीत आता गोविंदाचेही (Govinda) नाव घ्यावे लागणार आहे. गोविंदालाही कोरोनाची लागण झाली असून त्याने स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतले आहे. रविवारी सकाळीच अक्षय कुमारने त्याला कोरोना झाल्याची माहिती दिली होती आणि दुपारी गोविंदाने सोशल मीडियावर तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे जाहीर केले.

गेल्या एक-दोन दिवसांपासून गोविंदाला थोडा त्रास होत होता. त्यामुळे त्याने कोरोनाची टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आणि रविवारी सकाळी त्याने कोविड टेस्ट केली. त्याच्या टेस्टचा रिपोर्ट दुपारी आला तो पॉझिटिव्ह होता. परंतु कोरोनाची लक्षणे साधारण असल्याने गोविंदाने होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आणि आता तो घरातच आराम करीत आहे. गोविंदा जरी कोविड पॉझिटिव्ह आला असला तरी त्याची पत्नी सुनीता आणि मुलीचा कोविड रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आला आहे. गोविंदाच्या पत्नीने सुनिताने सोशल मीडियावर अपील केले आहे की, गेल्या काही दिवसात गोविंदाच्या संपर्कात जे आले होते त्यांनी स्वतःची कोरोना टेस्ट करून घ्यावी आणि स्वतःची काळजी घ्यावी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button