पुण्यात कोविड-१९ ‘मॉलिक्युलर’ चाचणी; अजित पवारांच्या हस्ते होणार उपकरणांचे उद्घाटन

COVID-19 Test Results In 13 Minutes - Ajit Pawar

मुंबई : कोरोना व्हायरसवर (Coronavirus) औषध शोधण्यासाठी जगभर संशोधन सुरू आहे. मात्र त्याला अजूनही पाहिजे तसे यश आलेले नाही. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संशयित रुग्णांची तातडीने टेस्ट करून त्यांना आयसोलेट करण्याचा प्रयत्न सगळेच देश करत आहेत. त्यासाठी तातडीनं टेस्ट करणं आणि त्याचा निकाल येणं गरजेचं आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात कोविड -१९ (COVID-19) ‘मॉलिक्युलर’ चाचणी होणार आहे.

अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासन आणि ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने पुणे शहराला देशात प्रथम प्रकारचे चाचणी उपकरण देण्यास मान्यता दिली आहे. कृष्णा डायग्नोस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडने आणलेल्या या उपकरणांचे शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन होईल. मॉलिक्युलर चाचणीमध्ये पाच मिनिटांत आणि १३ मिनिटांत नकारात्मक निकाल लागल्याचे दिसून येते. तंत्रज्ञान आरटी-पीसीआर चाचणीसारखेच आहे आणि त्यात घसा आणि नाकाच्या स्वब यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER