आता शाळांनाही पाच दिवसांचा आठवडा होण्याची शक्यता ?

Holidays to schools and colleges in Kolhapur

पुणे :- राज्यातील शाळांमध्ये आता पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील जिल्हा परिषदेला तसा प्रस्ताव करायला सांगितले असल्याची माहिती आहे. राज्य शासनाच्या कर्मचा-यांना पाच दिवसांचा आठवडा सुरु झालाच आहे. आता शा‍ळांतील शिक्षकांनाही या सवलतीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी जनगणना असल्याने शिक्षकांच्या मे महिन्यांच्या सुट्ट्या रद्द होणार आहे. मात्र असे झाले तर शाळांचे तास वाढण्याची शक्यता आहे.