आता तर युवराजही मुख्यमंत्र्यांचे ऐकत नाही? मनसेची खोचक टीका

Santosh Dhuri - Aaditya Thackeray - Uddhav Thackeray

मुंबई :- राज्यात कोरोनाचा (Corona) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने निर्बंध घातले आहे. ठराविक ग्राहकांना सेवा देण्याचा आदेश राज सरकारने हॉटेल, पब, बार आणि रेस्टारंट चालकांना दिला आहे. मात्र पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या वरळी विधानसभा क्षेत्रात पबमधे नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. वरळी भागातील पब्ज रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचा पर्दाफाश मनसेनं (MNS) केला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात ज्यात महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या वाॅर्डचाही समावेश होतो, तिथले सगळे पब्ज वीक एंडला कसे फुल्ल सुरू असतात याची पोलखोलच मनसेचे नेते संतोष धुरी (Santosh Dhuri) यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केली आहे. सोमवारी रात्री 12.30 वाजेपर्यंत मोठी गर्दी करत या पब्जमध्ये तरुण तरुणी संगीताच्या तालावर थिरकताना दिसत आहे. यात कोरोनाचे नियम कसे पायदळी तुडवले जातायत हे अगदी स्पष्ट दिसतंय. मग सर्वसामान्यांना एक न्याय आणि श्रीमंतांना वेगळा न्याय आहे हे स्पष्ट दिसतंय, अशी टीका धुरी यांनी केली.

महाराष्ट्रात काही ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लाॅकडाऊन केले जात आहे. तिथे वरळीतल्या कमाल मिल, फिनिक्स मिल इथे मात्र सगळे नियम पायदळी तुडवल्याचं चित्र आहे. एकीकडे स्वत: महापौर किशोरी पेडणेकर यांनी दादरच्या भाजी विक्रेत्यांना मास्कचं वाटप केलं आणि या पब्जकडे कानाडोळा का ? असा सवाल आता या निमित्ताने विचारला जातोय. एकंदरीतच या कोरोना काळातही वरळी मतदारसंघात जोरदार ‘नाईटलाईफ’ सुरू आहे.

कोरोनाबद्दलचे नियम फक्त सामान्य माणसांनाच लागू आहेत का ? धनदांडग्यांना सर्व काही माफ आहे का ? सर्वसामान्य लोकांनाच कोरोनाची भीती दाखवायची आणि श्रीमंतांच्या पोरांना नाईटलाईफ हे असं कसं असू शकेल” असा सवाल संतोष धुरी यांनी विचारला. “हेच का ते मुख्यमंत्र्यांच आवाहन ? मुख्यमंत्र्यांचं कुणी मंत्री ऐकत नाही. गर्दी करू नका सांगितलं तर राठोडसारखे मंत्री शक्तीप्रदर्शन करतात, आता तर त्यांचे मंत्री आणि पुत्र, युवराज पण त्यांचं ऐकत नाही का ? त्यांच्या मतदार संघात गर्दीला कोरोनाची भीतीच नाही का? हीच का यांची नाईटलाईफ ? मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत जनतेला नियम सांगतात आणि इथे त्यांच्या युवराजाच्या मतदार संघात सगळे पब्ज फुल्ल आहेत. याचाच अर्थ आता युवराजही यांचं ऐकत नाहीत का ? असा प्रश्नांचा भडीमार धुरी यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER