आता ईडी उघडणार काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकाराची फाईल?

मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या नेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने नोटीसा (ED Notice) बजावल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता राज्य सरकारचे कृषी विभागाच ईडीच्या रडारवर आले आहे. 2007 ते 2014 या काळात काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) आघाडी सरकारामध्ये घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

महाविकास आघाडी सरकारने आपला १ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. पण, आता नवीन वर्षात महाविकास आघाडी सरकारपुढे एकएक अडचणी वाढत चालल्या आहे. नेते आणि आमदारांपाठोपाठ ईडीची नजर आता राज्य सरकारच्या कृषी विभागावर आहे. 2007 ते 2014 हा काळात अर्थात आघाडी सरकारच्या काळातील कृषी विभागाच्या योजनांची ईडी चौकशी करण्याची शक्यता आहे.

2007 ते 2014 च्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार होते. या काळात कृषी विभागामार्फत चालवण्यात आलेल्या योजनात गैरव्यवहार झाल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे. 2007 ते 2014 या काळात कृषी विभागातून सूक्ष्म सिंचन योजनेत घोटाळा झाल्याची शंका ईडीला आहे. अंदाजे 800 कोटींचा हा व्यवहार असून यात मोठ्या कंपन्यांचा सहभाग आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER