आता घरपोच प्या देशी दारू आघाडी सरकारचा निर्णय

Maharashtra Today

मुंबई :- ऑनलाइन (Online)वा फोनवर ऑर्डर (Phone Order) करा आणि घरपोच देशी दारू (Liqour At Home) बोलवा अशी सोय राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने तळीरामांना उपलब्ध करून दिली आहे. सोमवारी त्या बाबतचा आदेश काढण्यात आला.

संचारबंदी लागू केली तेव्हा केवळ परमिट रुम/बीअर बारमधून टेक अवे (Take away from the beer bar) म्हणजे पार्सल सेवा देण्याचा निर्णय झाला होता. आता वाईन शॉपमधून (Wine Shop) तुम्हाला घरपोच दारू बोलविता येईल. असाच निर्णय हा देशी दारू दुकांनाबाबतदेखील घेण्यात आला आहे. त्यामुळे वाईन शॉप वा देशी दारूची दुकाने उघडणार नाहीत पण तेथून घरपोच सेवा देण्याची मात्र अनुमती असेल.

ग्राहकास कोणत्याही परिस्थितीत देशी, विदेशी दारुच्या दुकानात जाता येणार नाही. मद्य उत्पादक कारखान्यांमधून घाऊक व किरकोळ विक्रेत्यांना दारूचा पुरवठा करण्यासाठीच्या वाहतुकीला परवानगी असेल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने त्या संदर्भात कार्यवाही करावी असे आदेशात म्हटले आहे.

मायक्रो कंटेन्मेंट झोनसाठी एसओपी केली जारी

हाऊसिंग सोसायट्यांमध्ये एका इमारतीत पाच किंवा त्यापेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले तर ती इमारत मायक्रो कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात येईल. तिथे कुठल्या नियमांचे पालन करावे लागेल आणि नियमांचे उल्लंघन केल्यास त्यासाठी कुठला दंड ठोठावला जाईल या बाबतचा आदेश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सोमवारी काढला. त्यानुसार नियमांचे उल्लंघन करणाºया हाऊसिंग सोसायटीला १० हजार रुपयांचा दंड सुनावला जाईल. त्यानंतरही नियमांचे उल्लंघन सुरूच राहिले तर आणखी दंड ठोठावण्याचा अधिकार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीला असेल.

मायक्रो कंटेन्मेंट झोनमधील लोक नियमांचे उल्लंघन करीत आहेत आणि त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याचे आढळले तर तेथील रहिवाशांना दंड ठोठावण्याचा अधिकार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाºयाकडे (डीएमए) राहील. सलग पाच दिवस एकही नवीन रुग्ण आढळला नाही आणि कोरोना रुग्णांची संख्या पाचपेक्षा कमी असेल तर मायक्रो कंटेन्मेंट झोनमधून ती सोसायटी वा विशिष्ट इमारत वगळण्याचा अधिकार हा डीएमएकडे असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button